शरीरात नळ्या असतानाही पूर्ण केलं चित्रीकरण, महेश मांजरेकरांचा हा किस्सा वाचाच.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahesh manjrekar birthday : he fought with cancer and complete film shooting in cancer treatment period

शरीरात नळ्या असतानाही पूर्ण केलं चित्रीकरण, महेश मांजरेकरांचा हा किस्सा वाचाच..

mahesh manjrekar birthday : मराठी मनोरंजन विश्वातील एक दिग्गज नाव म्हणजे दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर. कारण त्यांचा दे धक्का हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालत आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन करत आहेत. महेश मांजरेकरांनी मराठी मनोरंजन विश्वाला अनेक दमदार चित्रपट दिले. आज १६ ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस. त्या निमित्ताने जाणून घेऊन त्यांची एक खास बात. महेश मांजरेकर (mahesh manjrekar)यांचा दरारा मनोरंजन विश्वात आहेच. शिवाय ते शब्दाचे इतके पक्के आहेत कि लोक त्यांचा आदर्श घेतात. ते कामाच्या बाबतीत इतके जिद्दी आहेत की गेल्यावर्षी त्यांच्यावर कर्करोगाचे उपचार सुरु असताना शरीरभर नळ्या लावलेल्या असतानाही त्यांनी चित्रीकरणाला प्राधान्य दिलं. तोच हा किस्सा... (mahesh manjrekar birthday : he fought with cancer and complete film shooting in cancer treatment period)

महेश मांजरेकर आज जरी कर्करोगातून पूर्णपणे बरा झाला असला तरी त्यांचा हा संघर्ष मोठा आहे. त्यांनी अशा काळात सुद्धा चित्रीकरण सुरु ठेवले होते. त्याविषयी ते एका मुलाखतीत म्हणाले होते. 'बिग बॉस मराठी ३ कार्यक्रमाचा पहिला प्रोमो जेव्हा चित्रीत झाला तो अनुभव आजही माझ्या चांगला लक्षात आहे. चित्रीकरणावेळी मला प्रचंड वेदना होत होत्या. तरीही मी हा प्रोमो तितक्याच जिद्दीने आणि प्रामाणिकपणे चित्रीत केला. शरीरात अनेक ठिकाणी नळ्या लावलेल्या होत्या. शूटिंगवेळी त्या नळ्या कॅमेऱ्यात दिसू नयेत यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. मी गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीमध्ये काम करत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये चित्रीकरण पूर्ण करायचे इतकेच मला माहीत होते. मला ज्या वेदना, जो त्रास होत होता त्याबद्दल माझी काहीच तक्रार नव्हती. चित्रीकरण करताना मी खूप अस्वस्थ होतो. परंतु माझी ही अस्वस्थता चेहऱ्यावर दिसू न देता मी हे चित्रीकरण पूर्ण केले.' असा अनुभव त्यांनी सांगितला होता.

कॅन्सरशी लढाई सुरू असतानाच त्यांनी काम बंद केलं नव्हतं. याविषयी ते म्हणाले होते, 'लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात आगामी 'अंतिम' सिनेमांचं चित्रीकरण पूर्ण केलं. दरम्यान मला कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. एकीकडे चित्रीकरण सुरु होतं आणि मी केमोथेरेमी घेत होतो. शस्त्रक्रिया होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत मी सिनेमावर काम करत होतो. हे सर्व मी माझ्या हट्टासाठी केलं; स्वतःसाठी केलं.' त्यामुळे महेश मांजरेकर यांच्या कामाचा आणि त्यांच्या जिद्दीचा सर्वांना आदरच नाही तर अभिमान ही आहे.

Web Title: Mahesh Manjrekar Birthday He Fought With Cancer And Complete Film Shooting In Cancer Treatment Period

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :mahesh manjrekar