Bigg Boss Marathi 4: राखीच्या तालावर किरण माने नाचतोय, डोलतोय आणि लोळतोय सुद्धा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahesh manjrekar talks about rakhi sawant and kiran mane in big boss marathi 4 chavdi

Bigg Boss Marathi 4: राखीच्या तालावर किरण माने नाचतोय, डोलतोय आणि लोळतोय सुद्धा..

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात दर वीकेन्डला भरणारी चावडी हा शो मधला सर्वात महत्त्वाचा भाग. तो या कारणानं कारण याच ठिकाणी महेश मांजरेकर घरातील सदस्यांचा आठवड्याभराचा हिशोब मांडताना दिसतात. कुणी काही चांगली गोष्ट केली असेल तर ते प्रशंसा देखील करतात आणि कुणी घरात चुकीचं वागलं असेल तर त्याला खडे बोल सुनावतात. त्यामुळे मांजरेकर कुणाची खरडपट्टी काढणार याकडे सर्वांचे लक्ष असते. पण कालच्या भागात मात्र मांजरेकरांनी धमाल उडवली. याचे कारण होते राखी सावंत..

(mahesh manjrekar talks about rakhi sawant and kiran mane in big boss marathi 4 chavdi)

हेही वाचा: Malaika Arora: मी पुढे गेले.. माझा एक्स पुढे गेला.. पण तुम्ही.. मलायकानं ट्रॉलर्सची केली..

या आठवड्यात बिग बॉस मराठी ४ च्या घरात चार वााइल्ड कार्ड एन्ट्री झाल्या. बिग बॉसच्या खेळाचा कडक अनुभव असलेले राखी सावंत, मीरा जगन्नाथ, विशाल निकम, आरोह वेलणकर हे चौघे घरात आले आणि नुसता धुमाकूळ घालत आहे. त्यात राखीने तर नुसता कहर केला आहे. तिने एकेकाची बोलती बंद केलीच शिवाय तिच्या विचित्र शैलीने प्रेक्षकांना पार हसवून वेडं केलं आहे. घरातील प्रत्येक जण जणू तिचा गुलाम झाला आहे आणि ती राणी. अगदी सतत इतरांना धारेवर धरणारा किरण माने देखील तिच्यामागे लट्टू झाला आहे. यावरच मांजरेकरांनी त्याची फजिती केली.

मांजरेकर म्हणाले, 'राखी आल्यापासून तिने नुसता धुमाकूळ घातला आहे. तिने राखी राणी झाली तुम्ही सगळे तिचे गुलाम झालात. या घरात तुम्ही आधी आलात याचाही तुम्हाला विसर पडला. अमृता देशमुख सोडलं तर कुणीही तिच्या विरोधात गेलं नाही. तुम्ही सगळ्यांनी फक्त माना डोलावल्या. आणि किरण माने तर काही विचारुच नका. राखी पुढे पुढे किरण माने मागे मागे... '

त्यावर राखी म्हणते, 'बिलानशी नागिन निघाली नागोबा डुलाया लागला..' त्यावर मांजरेकर म्हणतात. माने डुलायलाच नाही तर लोळायला लागला राखी पुढे. त्यावर सर्वजण हसतात. अशी भन्नाट फजिती मांजरेकरांनी किरण मानेची केली.