महेश मांजरेकरांची माघार, चित्रपटातून आक्षेपार्ह दृश्यं वगळली | Mahesh manjrekar varanbhat loncha kon nai koncha movie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Controversial Scene in Mahesh Manjrekar's Movie
महेश मांजरेकरांची माघार, चित्रपटातून आक्षेपार्ह दृश्यं वगळली

महेश मांजरेकरांची माघार, चित्रपटातून आक्षेपार्ह दृश्यं वगळली

मुंबई - प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर (mahesh manjrekar) हे त्यांच्या वरण भात लोन्चा अन् कोन नाय कोन्चा (marathi movie) या चित्रपटामुळे चर्चेत आले होते. काल या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्या ट्रेलरमध्ये असणाऱ्या आक्षेपार्ह दृष्यांमुळे (varanbhat loncha kon nai koncha Controversial Scene) त्यांच्यावर टीका झाली होती. राज्य महिला आयोगानं देखील त्यांच्या या चित्रपटाच्या ट्रेलरची नोंद घेत मांजरेकर यांना कारणे द्या. नोटीस पाठवली होती. त्यावर मांजरेकर यांनी माघार घेतल्याचे कळते आहे. आणि आपल्या चित्रपटातून ती दृश्ये काढल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मराठीतील दिवंगत प्रख्यात कथाकार जयंत पवार (jayant pawar) यांच्या वरण भात लोन्चा अन् कोण नाय कोन्चा या कथेवर आधारित हा चित्रपट असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी देखील एका पत्रकार परिषदेमध्ये मांजरेकर यांनी आपल्या या चित्रपटावर सेन्सॉ़र बोर्डानं अनेक कट्स सांगितले आहेत. मात्र आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले होते. दोन दिवसांपासून व्हायरल झालेल्या ट्रेलरनं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यावर मांजरेकर यांना वाढता विरोध लक्षात घेऊन दृश्ये काढावी लागल्याचे बोलले जात आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये मांजरेकर म्हणाले होते की, याप्रकरणी मांजरेकर यांनीही प्रतिक्रिया दिलीय.....ते म्हणाले..... ट्रेलर पाहून चित्रपट कसा आहे हे ठरवणाऱ्यांविषयी मी काय बोलू. यापूर्वी माझ्या भाई आणि नटसम्राटलाही विरोध झाला होता. आपल्याकडे स्लमडॉगलाही विरोध झाला होता. मात्र पुढे तोच चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत होता. हे आपण विसरतो. माझा चित्रपट टीकाकारांच्या टीकेवर बोलेल. अशा प्रकारची प्रतिक्रिया महेश मांजरेकर यांनी आपल्या चित्रपटावर दिलीय.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top