महेश मांजरेकरांची मोठी घोषणा; जय दुधाणेला घेऊन करणार चित्रपट | Jay Dudhane | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jay Dudhane

महेश मांजरेकरांची मोठी घोषणा; जय दुधाणेला घेऊन करणार चित्रपट

बिग बॉस मराठी ३च्या ग्रँड फिनालेमध्ये सूत्रसंचालक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी मोठी घोषणा केली आहे. जय दुधाणेला (Jay Dudhane) घेऊन चित्रपट करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. या चित्रपटाचं नाव 'शनिवारवाडा' (Shaniwarwada) असेल असं त्यांनी सांगितलं. मांजरेकरांच्या या घोषणेमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 'शनिवारवाडा' या चित्रपटात जयसोबत इतक कोणते कलाकार झळकणार याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

बिग बॉसच्या घरात जयने त्याच्या आक्रमन शैलीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याचा घरातील संपूर्ण प्रवास आणि घरात येण्यापूर्वीचाही प्रवास रंजक आहे. जय हा रोडीज या प्रसिद्ध रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाला होता.

जय दुधाणेने बिग बॉस तेलुगूच्या तिसऱ्या सिझनमध्येही भाग घेतला होता. तर स्प्लिट्सविला या शोचं विजेतेपद त्याने पटकावलं आहे. बिग बॉस मराठी ३च्या घरातील सर्वांत दमदार स्पर्धकांपैकी एक जय आहे. मात्र अनेकदा तो त्याच्या स्वभावामुळे आणि वागण्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल होतो. आपल्या तापट स्वभावामुळे बिग बॉसच्या घरात अनेकांशी तो वाद ओढवून घेतो.

Web Title: Mahesh Manjrekars Is Going To Make A Film With Jay Dudhane And The Name Is Shaniwarwada

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top