Mahesh Tilekar: रमजानला मुस्लिमांच्या बिर्यानीवर ताव मारणारे नेते.. हिंदुत्वावर महेश टिळेकर आरपार..

दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी हिंदुत्ववाद्यांना चांगलेच खडसावले आहे.
Mahesh Tilekar on hinduism pathan controversy boycott trend and rajanikanth visit dargah
Mahesh Tilekar on hinduism pathan controversy boycott trend and rajanikanth visit dargah sakal

दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर (mahesh tilekar) हे कायमच समाजातील ज्वलंत विषय आणि समस्यांवर भाष्य करत करतात. अनेकदा त्यांच्या विचारांना ट्रॉलहि केले जाते. पण त्यांच्या फेसबुक पोस्टमुळे अनेकदा बदल घडतानाही दिसून आले आहे. मग तो मनोरंजन विश्वातील कंपूशाहीचा मुद्दा असो की जुन्या अभिनेत्रींना सन्मान देण्याचा मुद्दा असो. ते नेहमीच समाज माध्यमावर सक्रिय असतात. आता त्यांनी थेट हिंदुत्वावर भाष्य केले आहे. राजकारण करण्यासाठी बेगडी हिंदुत्व दाखवणाऱ्यांना त्यांनी एक सणसणीत लगावली आहे.

(Mahesh Tilekar on hinduism pathan controversy and rajanikanth visit dargah)

Mahesh Tilekar on hinduism pathan controversy boycott trend and rajanikanth visit dargah
Pushkar Shrotri: रंगाचा आणि धर्माचा काय संबंध.. पुष्कर श्रोत्री कडून राम कदमांचा समाचार..

सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चांगलेच वातावरण तापले आहे. कोणत्याही मुद्द्यावर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत आहेत. मग तो आमीरचा 'लालसिंग' चित्रपट असतो किंवा आताचा शाहरुखचा 'पठाण'.. वास्तविक या सगळ्याचा हिंदुत्वाशी काहीच संबंध नसताना राजकारण केले जात आहे. यावरच आता दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी सडेतोड भाष्य केले आहे.

Mahesh Tilekar on hinduism pathan controversy boycott trend and rajanikanth visit dargah
Swapnil Joshi: घाबरून असतो बायकोला.. स्वप्नील जोशीचा बायकोसाठी खास उखाणा..

टिळेकर यांनी एक पोस्ट शेयर केली आहे, त्यात ते म्हणतात, 'हिंदुत्व आणि हिंदुत्वासाठी दिलेल्या योगदानाबद्दल स्वप्नील जोशी, शरद पोंक्षे यांना देण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल मी दोन एक दिवसांपूर्वी पोस्ट लिहिली होती. त्याच पोस्ट मध्ये मी हिंदूंच्या वैष्णोदेवी मंदिरात जाऊन नतमस्तक होणारा शाहरुख खान आणि स्वतः च्या ऑफिस मध्ये हिंदू पद्धतीने पूजा विधी करणारा आमिर खान यांनी स्वतः मुस्लिम धर्मीय असूनही हिंदू धर्माचा आदर केल्याबद्दल कोणती संघटना यांना पुरस्कार देईल का ? असा प्रश्न केला होता.'

''ही पोस्ट नंतर मी डिलीट केली, त्याला कारण म्हणजे काहींनी जातीवरून कमेंट्स करणाऱ्या एकमेकांचा उद्धार सुरू केला होता, एकतर मी स्वतः जात मानत नाही म्हणून आणि एका विद्वानाने कमेंट्स मधून शाहू फुले आंबेडकर यांचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख केला जो मला आवडला नाही.''

''शाहरुख खान, आमिर खान यांच्या बाजूने वक्तव्य केल्यामुळे कंत्राटी पद्धतीने कमेंट्स मधून ट्रोल करण्याचे काम करणाऱ्या बेरोजगारांनी मला हिंदुत्व म्हणजे काय हे माहीत नसल्याचा आरोप केला. काहींनी दीपिका पदुकोण ने घातलेल्या भगव्या ड्रेस वरून हिंदूंचा झालेला अपमान तुम्हाला चालतो का असा प्रश्न केला. दोन दिवसांपू्वी प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत ने हिंदू असूनही संगीतकार रेहमान याच्या बरोबर एका दर्ग्यावर जाऊन दर्शन घेतले, त्यावेळी त्याच्या आणि रेहमानच्या खांद्यावर भगव्या रंगाचे उपरणे, डोक्यावर भगव्या रंगाचे मुंडासे दिसत आहे. आता या दोघांना पण हिंदूंचा अपमान केला म्हणून कुणी नावं ठेवली तर चुकीचं नाही का???''

1)मुस्लिम असूनही फुटपाथ वरील छोट्या हिंदू मुलीला घरात आणून तिला मुलगी मानून तिला वाढवणारे सलमानचे वडील सलीम खान,

2) नातेवाईकांचा विरोधाला बळी न पडता, स्वतः ची श्रद्धा आहे म्हणून गणेशोत्सवात घरी गणपतीची प्रतिष्ठापना करून दहा दिवस गणपतीची आरती,पूजा करणारी पुण्यातील मुस्लिम महिला,

3) मराठी रंगभूमीवर आपल्या आवाजाने, अभिनयाने ठसा उमटविणाऱ्या आणि नाट्यसंगीतात मोलाचं योगदान देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री फय्याज शेख या पुण्यात आल्यावर दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जातात,पुढे दत्तमंदिरात ही जातात. मी त्यांच्या मुंबईतील घरी एकदा गेलो होतो तेंव्हा हिंदू देवी देवतांचे फोटो, मूर्ती त्यांच्या घरात दिसल्या. नियमित त्या पोथ्या , स्वामी चरित्र वाचतात. एकदा मी त्यांच्या तोंडून पसायदान ऐकले आहे.

अश्या अनेकांनी स्वतः च्या धर्माची भिंत आड न येऊ देता हिंदू धर्माचा केलेला आदर माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली राजकारण करणारे नेते दहीहंडी सारख्या हिंदू उत्सवाच्या कार्यक्रमाला शाहरुख खानला बोलवतात, तेंव्हा त्याच्या प्रसिध्दी, नावामुळे स्वतःचं उखळ पांढरं करून घेतात. ते चालतं त्यांना आणि त्यांच्या पक्षालाही.

''रमजान ला मुस्लिमांच्या मांडीला मांडी लावून शिरखुरमा ओरपणारे आणि बिर्यानीवर उभा आडवा हात मारणारे नेते ,त्यांना कुणी का सवाल करत नाहीत? थोडक्यात काय तर धर्माचं राजकारण आपापल्या सोयीप्रमाणे करणारे महाभाग समाजात आहेत. असो मी हिंदू आहेच पण माझ्या हिंदू धर्माबरोबरच इतर धर्माचाही मला आदर आहे आणि माझ्या धर्माचा आदर करणाऱ्या शाहरुख खान, आमिर खान, फय्याज, अश्या सगळ्यांचा मला अभिमान आहे,'' अशा कडक शब्दात त्यांनी हिंदुत्वावर भाष्य केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com