मराठी प्रेक्षक गेले कुठे? रिकाम्या थिएटरचा व्हिडीओ व्हायरल, महेश टिळेकरांचा..

मराठी चित्रपट हाऊसफुल्ल होत असल्याची चर्चा असली तरी वास्तव काही वेगळेच आहे. त्याचा भयानक व्हिडीओ समोर आला आहे.
mahesh tilekar on marathi film audience
mahesh tilekar on marathi film audience sakal

करोनामुळे प्रदर्शित न झालेले बरेच सिनेमे आता एका मागोमाग एक प्रदर्शित होत आहेत. यात हिंदी मराठी आणि अन्य प्रादेशिक भाषांमधील चित्रपटही आहेत. गेल्या आठवड्यात 'चंद्रमुखी' (chandramukhi) आणि 'शेर शिवराज' (sher shivraj) हे दोन मराठी चित्रपट रिलीज झाले. तर या आठवड्यातही बरेच चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीतआहेत.हिंदीशी दोन हात करत मराठी चित्रपट हिट ठरत असल्याची चर्चा सध्या जोरदार आहे. पण प्रत्यक्षात खरच असं घडतंय का?.. की वास्तव काही वेगळं आहे. यासंदर्भात माहिती देणारा एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

mahesh tilekar on marathi film audience
'आधी आपण सगळे भारतीय' बॉलीवूड विरुद्ध साऊथ वादात सई ताम्हणकरची उडी

दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत चित्रपटाचे नाव नसले तरी मराठी चित्रपटाला केवळ दोन प्रेक्षक आल्याचे हे भीषण वास्तव आहे. हा व्हिडीओ शेअर करत.. मराठी प्रेक्षक गेला कुठे? असा सवाल महेश टिळेकर यांनी केला आहे.

mahesh tilekar on marathi film audience
'शेर शिवराज'ची विक्रमी घोडदौड.. भारतासह परदेशातही 'हाऊसफुल्ल'

ते म्हणतात, 'प्रदर्शनाआधी भरपूर प्रसिद्धी करून सिनेमाची हवा करण्यात आलेला आणि नुकताच प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट मी रीलिजच्या पहिल्या दिवशीच थिएटर मध्ये जाऊन पाहिला. त्यावेळी साधारण शंभर एक प्रेक्षक होते. वाटलं आज पहिला दिवस असल्यामुळे कदाचित प्रेक्षक कमी असतील.पण चित्रपट प्रदर्शित होऊन काही दिवस झाले तसे या चित्रपटात काम केलेल्या प्रसिद्ध कलाकारांनी आपापल्या सोशल मीडियावर पोस्ट टाकून आणि डिजिटल मीडिया ने सातत्याने बातम्या मधून या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून करोडो रुपयांचा गल्ला या सिनेमाने जमवला आहे अशी माहिती दिली. ते पाहून माझ्या ओळखीच्या ज्या लोकांनी हा सिनेमा पाहिला नव्हता त्यांना मी थिएटर मध्ये जाऊन हा सिनेमा बघायचा आग्रह केला. सिनेमाला गर्दी असणार म्हणून ऑनलाईन तिकीट आधी बुक करा असेही सांगितले.'

'आज माझे दोन मित्र अडव्हान्स बुकिंग न करताच अंधेरीतील मल्टिप्लेक्स मध्ये हा सिनेमा पहायला गेले.तर संपूर्ण थिएटर मध्ये ते दोन मित्रच.बाकी प्रेक्षकच नाही. त्यांनी तिथूनच मला फोन करून सांगितलं " तुम्ही तर सांगत होता गर्दी असणार आधी तिकीट बुक करा, पण इथे तर प्रेक्षकच नाही, बरं झालं ऑनलाईन तिकीट नाही बुक केलं नाहीतर जास्त पैसे गेले असते". त्यांचं बोलणं ऐकून मला वाटलं कदाचित ते माझी थट्टा करत असतील. मी त्यांना तसे बोलूनही दाखवले.रोज सोशल मीडियावर ज्या सिनेमाच्या विक्रमी कलेक्शन बद्दल बातम्या येतायेत, ते खोटं कसं असेल? बरंऑनलाईन बुक माय शो वर तर या सिनेमाला 80% पेक्षा जास्त रिस्पॉन्स असल्याचं दाखवतायेत. मग हे सगळं खोटं कसं असू शकेल? असे टिळेकर म्हणाले.

पुढे ते म्हणले, 'मित्राने लगेच थिएटर मध्ये प्रेक्षक किती आहे ते दाखवण्यासाठी मोबाईल वर व्हिडिओ शूट करून मला पाठवला.तो व्हिडिओ पाहून माझी खात्री पटली. सिनेमाच्या इंटरव्हल मध्ये परत फोन करून त्याने मला सांगितलं की आधी ते दोघेच होते नंतर आणखी चारजण आले. चारमधील, एक वयोवृद्ध जोडपे होते आणि दुसरे जोडपे जे आले होते ते सिनेमापेक्षा थिएटर मधील अंधाराचा व्यक्तिगत आनंद घेण्यासाठी आल्याचे दिसत होते.

'करोडो रुपये खर्च करून बनविण्यात आलेला आणि त्यावर करोडो रुपये पब्लिसिटी खर्च केलेल्या सिनेमाला बोटावर मोजण्याइतके प्रेक्षक यावे हे त्या चित्रपटाच्या संपूर्ण टीम विशेषतः कलाकारांच्या साठी किती दुःख दायक असेल. त्या सिनेमाला प्रेक्षक नाही हे त्या सिनेमाचं दुर्दैव की प्रेक्षक जबाबदार??' असा सवाल या पोस्टमधून महेश टिळेकर यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com