'आधी आपण सगळे भारतीय' बॉलीवूड विरुद्ध साऊथ वादात सई ताम्हणकरची उडी|sai tamhankar reacts bollywood vs south controversy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sai tamhankar on bollywood vs south controversy

'आधी आपण सगळे भारतीय' बॉलीवूड विरुद्ध साऊथ वादात सई ताम्हणकरची उडी

'हिंदी ही राष्ट्रभाषा आहे की नाही' यावरून काही दिवसांपूर्वी किच्चा सुदीप (kichcha sudeep) आणि अजय देवगण (ajay devgan) यांच्यात सुरु झालेला वाद दिवसेंदिवस अधिकच रंगत चालला आहे. हिंदी भाषेबाबबत सुदीपने केलेले वक्तव्य आणि त्यावर अजय देवगण याने दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी डबिंग केलेले विधान इथपासून सुरु झालेल वाद आता बॉलीवूड श्रेष्ठ की टाॅलीवूड इथपर्यंत आला आहे. या प्रकरणात रोज नवीन विचार, मतप्रवाह पुढे येत आहे. आता मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर (sai tamhankar) हिने देखील आपले मत मांडले आहे.

हेही वाचा: चित्रपट चालणं तर दूर, प्रदर्शित होतायत हीच मोठी गोष्ट.. हेमांगी कवीची खंत

गेल्या काही दिवसात या प्रकरणात राम गोपाल वर्मा, श्रेयस तळपदे, सोनू सूद, रितेश देशमुख, कंगना रणौत अशा अनेक कलाकारांनी आपले मत मांडले. दाक्षिणात्य कलाकारही यावर बोलत आहेत. काहींच्या मते भाषिक वाद नको, काहींच्या मते हिंदी ही राष्ट्रभाषा होऊ शकत नाही तर काहींनी भारतीयत्व हे प्रधान असल्याचे नमूद केले आहे. सईनेही आपल्या विचारांचा समतोल राखला आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सईने परखड भूमिका मांडली.

हेही वाचा: सौंदर्या सोबत माझं नातं फार काळ टिकू शकल नाही..  विशाल निकमच ब्रेकअप..

सई ताम्हणकरनं आतापर्यंतच्या तिच्या कारकिर्दीत मराठी आणि हिंदीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटांध्येही काम केलं आहे. त्यामुळे तिला दोन्ही प्रवाहांच्या बाजू ठाऊक आहेत. सध्या चित्रपटसृष्टीत सुरू असलेल्या वादावर बोलताना ती म्हणाली, 'मला वाटतं आपण या सर्व गोष्टींमध्ये पडायला नको. कारण सर्वात आधी आपण सगळे भारतीय आहोत. आपण वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट बनवतो कारण आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. सर्वच भाषा आपल्या आहेत.'

Web Title: Sai Tamhankar Reacts Bollywood Vs South Controversy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top