HBD Mahima Chaudhary: लग्नानंतरही महिमा नव्हती खुश, यामुळेच घडल्या 'त्या' दोन दुःखद घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahima Chaudhry Birthday

HBD Mahima Chaudhary: लग्नानंतरही महिमा नव्हती खुश, यामुळेच घडल्या 'त्या' दोन दुःखद घटना

Mahima Chaudhary Birthday: 'परदेस' फेम अभिनेत्री महिमा चौधरी ही फार काळ बॉलीवुडमध्ये ॲक्टिव्ह नसली तरी तिच्या पर्सनल लाईफमुळे ती जास्त चर्चेत राहिलेली अभिनेत्री आहे. वयाच्या ४९ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीची लव केमिस्ट्री फारच क्लिश्ट होती. एके काळी लोकप्रिय असणारी ही अभिनेत्री स्वत:च्या लग्नात नाराज होती अशी चर्चा होती. त्यामागचं नेमकं खरं कारण काय ते जाणून घेऊया.

अभिनेत्री महिमाचं अफेयर एके काळी टेनिस खेळाडू लिएंडर पेससोबत सुरू होतं अशी चर्चा होती. मात्र रिया पल्लईमुळे या दोघांच्या नात्यात दुरावा आला. नंतर २००६ मध्ये त्यांचं लग्न बिजनेसमॅन बॉबी मुखर्जीशी झालं. मात्र हे नातंही जास्त काळ टिकलं नाही.

आयुष्यात आलेत बरेच चढउतार

२०२१ मध्ये माध्यमांशी बोलताना महिमाने तिच्या पर्सनल आयुष्यातील काही गंभीर किस्से शेअर केलेत. त्यातील एका घटनेचा परिणाम थेट तिच्या करियरवर झाला. याबरोबरच लग्नानंतरच्या अडचणी आणि दोनदा झालेले गर्भपात यावरही तिने भाष्य केले. लग्नानंतर महिमा तिच्या वैवाहिक जीवनात खुश नव्हती. लग्नानंतर दोनदा झालेल्या गर्भपाताचे मुख्य कारण तिची लग्नानंतरची नाराजीच होती, असेही ती माध्यमांशी बोलताना म्हणाली.

हेही वाचा: Mahima Chaudhary: महिमाला 'ब्रेस्ट कॅन्सर', अनुपम खेर यांची पोस्ट

अभिनेत्री महिमा चौधरीने काही महिन्यांपूर्वी तिला ब्रेस्ट कँसर झाल्याची घोषणा केली होती. योग्य उपचार घेत तिने मोठ्या धैर्याने स्वत:ला कँसरमुक्त केले आहे. अनेक बड्या कलाकारांनी यावेळी तिला मानसिक पाठबळही दिले होते.

Web Title: Mahima Chaudhary Birthday Troubled Marriage Two Miscarriages Bollywood Career Read Her Struggle Life

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..