Mahira Khan : 'मी पठाण सोबतच' पाकची अभिनेत्री बोलली, खासदारांचा संताप!

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरानं बॉलीवूड सेलिब्रेटींची बाजू घेणं ही तिची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील तिनं बॉलीवूड कलाकारांवर पोस्ट करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
Mahira Khan
Mahira Khanesakal
Updated on

Mahira Khan Pakistani Actress Shah Rukh Khan : पाकिस्तानी अभिनेत्री माहिरानं बॉलीवूड सेलिब्रेटींची बाजू घेणं ही तिची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील तिनं बॉलीवूड कलाकारांवर पोस्ट करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. मायरा ही त्यांच्या देशात लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण गेल्या काही दिवसांत बॉलीवूडविषयी तिची आपुलकी जरा जास्तच वाढलेली दिसते.

पाकिस्तानमध्ये चालणाऱ्या रियॅलिटी शो मध्ये माहिरा खानवर काही प्रश्न विचारले जातात. तिच्या अभिनयावरुनही बरेचसे प्रश्न विचारण्यात आले असून त्याविषयी अभिनेत्रीनं नाराजी देखील व्यक्त केली होती. माझी बदनामी केली जात असल्याचे सांगितले होते. आता तर तिनं थेट बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान विषयी प्रतिक्रिया दिल्यानं ती चर्चेत आली आहे. तिचं म्हणणं आहे की, मला जसं वाटतं तसं मी बोलणार यामुळे कुणाला काय वाटतं हे माझ्या दृष्टीनं महत्वाचं नाही.

Also Read - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

दरवेळी माझ्यावरच का बोलणं होतं हे मला कळत नाही. मी जर शाहरुखचं कौतूक केलं तर बिघडलं कुठं, मी पठाणच्या शाहरुखच्या अभिनयाची चाहती आहे. आणि मी त्याच्या सोबत आहे. असे जेव्हा म्हणते तेव्हा बाकीच्यांना राग येण्यासारखे काय आहे, माहिराची ही प्रतिक्रिया ऐकताच पाकिस्तानच्या काही खासदारांना तिचा राग आला आहे. त्यांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

एका पाकिस्तानी खासदारानं तर तिला मेंटल म्हटलं आहे. ही अभिनेत्री आता मेंटल सारखी करायला लागली आहे. अशी प्रतिक्रिया त्या खासदारानं दिली आहे. सोशल मीडियावर देखील अनेक नेटकऱ्यांनी माहिराला वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. खरं तर शाहरुखच नाही तर इम्रान खान यांची बाजू घेणं माहिराला महागात पडले होते.

Mahira Khan
Shah Rukh Khan : 'तू नशेत होता, त्यावेळी तुला...' अमिताभ यांनी शाहरुखला दिला मोलाचा सल्ला!

माहिरा एका इव्हेंटमध्ये गेली होती. त्यावेळी तिथं तिला पाकिस्तानच्या सध्याच्या राजकारणावर विचारण्यात आले होते. तुला पाकिस्तानमधील कोणत्या नेत्यावर सर्वाधिक विश्वास आहे अशा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. तेव्हा तिनं मी पठाणच्या बाजूनं आहे. या उत्तरात तिनं एका दगडात दोन पक्षी मारले होते. शाहरुखच्या बाजुनं उत्तर दिलं होतं. आणि इम्रान खान यांच्याविषयी सहानुभूती दर्शवली होती.

Mahira Khan
शाहरुखचा 'Pathaan'चा ओटीटीवरही दरारा! डिलिट केलेल्या 'त्या' सीनचे Video Viral

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com