शाहरुखचा 'Pathaan'चा ओटीटीवरही दरारा! डिलिट केलेल्या 'त्या' सीनचे Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pathaan Deleted Scenes:

शाहरुखचा 'Pathaan'चा ओटीटीवरही दरारा! डिलिट केलेल्या 'त्या' सीनचे Video Viral

Pathaan Deleted Scenes: शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित झाला आणि त्या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड बनवले. रिलिज आधी वादात सापडलेला हा चित्रपट अजूनही चर्चेत आहे. त्याची जादू दाखवत आहे.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या 'पठाण' या चित्रपटाचे चाहते OTT वर प्रदर्शित होण्याची खूप दिवसांपासून वाट पाहत होते. थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता तो ओटीटीवरही रिलिज झाला आहे.

पठाण हा चित्रपट 22 मार्च रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला होता आणि रिलीज झाल्यापासूनच ट्विटरवर त्याचीच चर्चा आहे. #Pathaan आणि #PathaanOnPrime हे ट्विटरवर ट्रेंड करत आहेत.

हा चित्रपट रिलीजपूर्वी बराच वाद झाला होता. त्यांनतर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही सीन्स हटवली आहेत. पण आता चित्रपट ओटीटीवर आल्यानंतर त्यात सर्व हटविण्यात आलेले सीन्स चाहत्यांना पाहता येणार आहेत.

'पठाण'च्या दोन सीनची सध्या खूप चर्चा होत आहे आणि यूजर्स म्हणत आहेत की या सीन्सने थेअटरमध्ये खुप दहशत निर्माण केली असती. यात एक सीन आहे ज्यामध्ये शाहरुखला खुर्चीला बांधून अत्याचार केले जात होते. या सीनची व्हिडीओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.

तर दुसऱ्या सीनमध्ये शाहरुख लिफ्टमधून बाहेर पडतो आणि ऑफिस एरियामध्ये डॅशिंग एंट्री करतो आणि सर्वच त्याच्याकडे नजर लावुन पाहतात.

हिंदी व्यतिरिक्त 'पठाण' 22 मार्चला प्राइम व्हिडिओवर तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये रिलीज झाला आहे.'पठाण'ने रिलीज झाल्यानंतर 43 दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर 513.50 कोटी रुपयांची कमाई केली. तर त्याने जगभरात 1040.40 कोटी रुपयांचे एकूण कलेक्शन केले आहे.