Main Atal Hoon : 'मैं आपसे आपकी निराशा, डर छिनने आया हू'! पंकज त्रिपाठीवर कौतुकाचा वर्षाव, कारणही खास

गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांच्या 'मैं अटल हू' नावाच्या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.
Pankaj Tripathi sounds like Atal Bihari Vajpayee in 'Main Atal Hoon
Pankaj Tripathi sounds like Atal Bihari Vajpayee in 'Main Atal Hoonesakal
Updated on

Pankaj Tripathi sounds like Atal Bihari Vajpayee in 'Main Atal Hoon': प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठीच्या मैं अटल हू मधील एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात त्याच्या आवाजातील एक संवाद कानावर पडतो. यामध्ये पंकजनं म्हटलेला तो संवाद प्रेक्षकांच्या, चाहत्यांच्या कौतुकाचा विषय आहे. त्यावर आलेल्या प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांच्या मैं अटल हू नावाच्या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. रवी जाधव हे त्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून त्यामध्ये पंकज त्रिपाठीनं अटलजींची भूमिका साकारली आहे. पंकज ती भूमिका साकारणार असल्यानं चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. Pankaj Tripathi sounds like Atal Bihari Vajpayee in 'Main Atal Hoon'

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या रिल्सनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तोच आवाज, तिच अटळ दुर्दम्य इच्छाशक्ती अन् जिद्द याचा प्रत्यय आपल्याला त्यातून जाणवला. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यावर आल्या आहेत. पंकजनंही त्याच्या यापूर्वीच्या अनेक मुलाखतीतून मैं अटल हू च्या प्रवासाविषयीच्या अनेक गोष्टींना शब्दरुप दिले आहे. त्यात त्यानं आपल्याला ही भूमिका साकारताना करावी लागलेली तयारी यावरही प्रकाशझोत टाकला आहे.

रवि जाधव यांचा हा बहुचर्चित चित्रपट १९ जानेवारी २०२४ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्याच्या रिलिज डेट अनाउसमेंटचा जो व्हिडिओ आहे त्याला मिळालेला प्रतिसाद प्रचंड आहे. बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी पंकजच्या त्या भूमिकेचे कौतुक केले आहे. त्याच्या या आगामी प्रोजेक्टसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

सेक्रेड गेम्स, मिर्झापूर, फुकरे, कडक सारख्या कलाकृतींमधून निराळ्या ढंगात प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या मैं अटल हू मध्ये पंकज वेगळ्याच प्रकारे प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याची कित्येकांना उत्सुकता आहे. पंकजचं कौतुक करताना एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे की, तुमच्या आवाजात जादू आहे. आम्हाला तुमच्या या भूमिकेची उत्सुकता आहे. तुम्ही त्यात प्रभावी कामगिरी केली असेलच यात शंका नाही.

Pankaj Tripathi sounds like Atal Bihari Vajpayee in 'Main Atal Hoon
Shah Rukh Khan: "माझ्या ४ बायकांना मी 'डंकी' बघू देणार नाही", फॅनच्या प्रश्नाला किंग खानने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाला...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com