esakal | ओळखलंत का चिमुकल्याला?; लोकप्रिय मराठी मालिकेत साकारतोय मुख्य भूमिका

बोलून बातमी शोधा

Virajas Kulkarni
ओळखलंत का चिमुकल्याला?; लोकप्रिय मराठी मालिकेत साकारतोय मुख्य भूमिका
sakal_logo
By
स्वाती वेमूल

फोटोमधील या चिमुकल्याला ओळखलंत का? स्टारकिड असूनही त्याने आता स्वबळावर मराठी मालिकाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा हा मुलगा असून नुकतंच त्याने मराठी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलंय. पहिल्याच मालिकेतून त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. फोटोमधील हा चिमुकला दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेत्री मृणाल कुलकर्णीचा मुलगा अभिनेता विराजस कुलकर्णी आहे. झी मराठी वाहिनीवरील 'माझा होशील ना' या मालिकेत विराजस मुख्य भूमिका साकारत असून याच मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला आहे.

विराजसने त्याच्या बालपणीचा हा फोटो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 'कॅमेराकडे पाहण्याची सवय ही अगदी लहानपणापासूनच होती', असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. विराजस आता २९ वर्षांचा असून अभिनयासोबतच तो लेखक आणि दिग्दर्शकसुद्धा आहे. 'हॉस्टेल डेज' या चित्रपटात त्याने काम केलं होतं. विराजसने आई मृणाल कुलकर्णींच्या 'रमा माधव' या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.

हेही वाचा : विराजससोबतच्या अफेअरच्या चर्चांवर शिवानीचं सूचक विधान, म्हणाली...

हेहस्टारकिड असूनही मला वशिला हा प्रकार अजिबात आवडत नाही, असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्याने लहानपणापासूनच आजोबा जयराम कुलकर्णींना काम करताना पाहिलंय. त्यांच्या कामाचा अंश त्याने नक्कीच घेतला आहे, असं मृणाल कुलकर्णी विराजसच्या अभिनयाविषयी एका मुलाखतीत म्हणाल्या. मृणाल कुलकर्णी यांचे आजोबा गो. नी. दांडेकर, सासरे जयराम कुलकर्णी, स्वत: मृणाल कुलकर्णी आणि आता त्यांचा मुलगा विराजस, अशी कुटुंबातील चौथी पिढी अभिनयविश्वात कार्यरत आहे.