Makar Sankranti : "देवेंद्रजी बायकोला मराठी शिकवा"; 'त्या' व्हिडीओवरुन अमृता फडणवीस ट्रोल

अमृता फडणवीस यांच्या पेहरावावरुनही त्यांना नेटकऱ्यांनी सुनावलं आहे.
Amruta Fadnavis
Amruta FadnavisSakal
Updated on

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातल्या वावरामुळे सतत चर्चेत असतात. आताही मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्यामुळे अमृता फडणवीस सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्या आहेत.

अमृता फडणवीस यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन मकर संक्रांतीवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्या निळ्या आऊटफिटमध्ये पतंग उडवत आहेत. या व्हिडीओच्याच माध्यमातून त्यांनी संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र त्यांच्या पेहरावावरुन आता त्यांच्यावर टीका होत आहे.

अमृता फडणवीस यांनी इंग्रजी भाषेत या शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यावरुनच नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. तसंच देवेंद्रजी आधी बायकोला मराठीत बोलायला शिकवा, मग गायक संगीतकार, असा सल्लाही दिला आहे. तर तीळगूळ घ्या मराठी नीट बोला, असंही काही जणांनी सांगितलं आहे.

अमृता यांच्या पोशाखावरुनही काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. किमान सणावाराला तरी मराठी पोशाख करायला हवा होता, अशी कमेंट करत काही जणांनी त्यांना सुनावलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

amruta khanvilkar
AMRUTA KHANVILKAR AFFAIR
Will Devendra Fadnavis Move to Delhi? Amruta Fadnavis Reacts
Amruta Fadnavis Maharashtra statement
Marathi News Esakal
www.esakal.com