मकरंद अनासपुरेंनी CAAवर दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 December 2019

सुधारित नागरिकत्व कायदा आणि नागरिक नोंदणी या दोन मुद्दय़ांवर देशभर तीव्र आंदोलन सुरु असताना मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मकरंद अनासपुरे म्हणाले की, राजकारणाचं भजं झालं आहे. एका मराठी वृत्तपत्राच्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत मकरंद अनासपुरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा आणि नागरिक नोंदणी या दोन मुद्दय़ांवर देशभर तीव्र आंदोलन सुरु असताना मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मकरंद अनासपुरे म्हणाले की, राजकारणाचं भजं झालं आहे. एका मराठी वृत्तपत्राच्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत मकरंद अनासपुरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मकरंद अनासपुरे म्हणाले, 'जेव्हा शासनव्यवस्था कुठलाही निर्णय घेते, तेव्हा त्यावर पूर्ण अभ्यास करून प्रतिक्रिया द्यायला पाहिजे. बऱ्याचदा शासन व्यवस्थेविरुद्ध व्यवस्थापन कार्यरत असते, त्यांना त्यांचं काहीतरी साधून घ्यायचं असतं. अनेकांच्या प्रतिक्रियांवरून कळतच नाही की हे नेमकं काय आहे. माझं वैयक्तिक मत असं आहे की, राजकारणाचं भजं झालंय.'

काँग्रेससोबत गेल्याने मानसिकता बदलली का?- हरिभाऊ बागडे 

खंत वाटावी अशी ही परिस्थिती आहे. एखाद्यावर विश्वास ठेवावा अशी सध्याची परिस्थिती नाही.  पूर्वीचे नेते ज्या ताकदीने, ज्या निष्ठेने उभे राहिले होते त्याचं शेवटपर्यंत त्यांनी पालन केलं होतं. अलीकडच्या काळात असं खूप कमी दिसायला लागलं आहे, असेही मकरंद अनासपुरे यांनी यावेळी म्हटले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Makrand Anaspure Comment on CAA and NRC