कॉंग्रेसबरोबर गेल्याने मानिकसता बदलली का ? - हरिभाऊ बागडे

प्रकाश बनकर
बुधवार, 25 डिसेंबर 2019

राष्ट्रीय सुरक्षा मंचातर्फे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ बुधवारी (ता.25) शहरात भव्य फेरी काढण्यात आली. फेरीचा समारोप सभेने झाला. यावेळी श्री. बागडे बोलत होते. त्यापूर्वी सकाळी 11 वाजता क्रांती चौकातून फेरी काढण्यात आली.

औरंगाबाद: महाराष्ट्रात युतीचे सरकार होते. तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री-गृहमंत्री होते. या दोघांनी बांगलादेशाच्या लोकांना परत पाठवले. ते शिवसेनेचे लोक एवढ्या लवकर विसरले का? आता तुम्ही कॉंग्रेससोबत गेल्याने, तुमची मानसिकता बदलली का? असा टोला माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी नागरिकत्व कायद्यावरून शिवसेनेला लगावला. 

राष्ट्रीय सुरक्षा मंचातर्फे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ बुधवारी (ता.25) शहरात भव्य फेरी काढण्यात आली. फेरीचा समारोप सभेने झाला. यावेळी श्री. बागडे बोलत होते. त्यापूर्वी सकाळी 11 वाजता क्रांती चौकातून फेरी काढण्यात आली.

हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही

उई सार्पोट सीएए'

फेरीत "उई सार्पोट सीएए', "तिरंगे के सन्मान मे देशभक्‍त मैदान मे', "सीएए के सन्मान मे देशभक्‍त मैदान मे' यासह "मोदी.. मोदी...' यासह तिरंगा झेंडा घेऊन विविध घोषणा फेरीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी दिल्या. क्रांती चौकातून निघालेली फेरी जिल्हा न्यायालय, विवेकानंद महाविद्यालयात, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, निराला बाजार येथून औरंगापुऱ्यात आली व महात्मा फुले चौकात फेरी समारोप झाला. 

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-

पाकिस्तानातून शहरात पंधरा ते तीस वर्षांपासून राहणाऱ्यांचा सत्कार 

या फेरीत पाकिस्तानातून शहरात पंधरा ते तीस वर्षांपासून राहणारे किशोर बोधाणी, विकी तलरेजा, बलराम पारसवाणी, श्रीचंद्र तालेजा, अमृत नाथानी यांना या कायद्या अंतर्गत नागरिकत्व मिळणार आहे. या पाचही जणांना माजी राज्यमंत्री अतुल सावे, किशनचंद तनवाणी, डॉ. भागवत कराड, एकनाथ जाधव, अप्पा बारगजे, दयाराम बसैय्ये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

हेही वाचा - फटाका तोंडात फोडला...अन असे घडले..

कायदा करा म्हणणारे आता गांधीजींच्या समाधीजवळ बसले 

बागडे म्हणाले, हा कायदा सहा धर्मासाठी आहे. हिंदू, शीख, पारशी, बौद्ध, जैन आणि मुस्लिमासाठी हा कायदा आहे. बौद्ध धर्मावर मोठा अत्याचार झाला आहे. हे नागरिक मोर्चे काढतात यांचे वाईट वाटते. हा कायदा संसदेने पास केला. 2003 मध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत विरोधीपक्षनेते असताना या कायद्यासाठी मागणी केली होती. मात्र आता त्यांना विसर पडला आहे. ते गांधीच्या समाधीजवळ जाऊन बसले आहेत. कॉंग्रेसने ठरवले असते तर झाले असते तर तेव्हाच कायदा झाला असता. शिवसेनेही युतीच्या काळात बांगलादेशातील नागरिकांना परत पाठविले होते. ते दिवस आठवावेत. देशाच्या संदर्भात राष्ट्रविषयाची भावना सर्व नागरिका विषयी एक असली पाहिजेत. शिवसेनेनेही अशी भावना ठेवावी असेही बागडे म्हणाले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: march for CAA support in Aurangabad