
'अगं मलायका त्या उर्फीला कॉपी करणं बंद कर', नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया Video Viral
बॉलिवूडमध्ये आपल्या फिटनेस आणि स्टाईलने सर्वाच्या मनावर राज्य करणारी मलायका ही नेहमीच तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. शुक्रवारी एका कार्यक्रमात अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली. या सोहळ्यात अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, क्रिती सेनॉन, भूमी पेडणेकर, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांसारखे कलाकार दिसले.
मलायका आणि अर्जुन दोघेही एकत्र पोज देताना दिसले. दोघे एकत्र खूप आनंदी दिसत आहेत. एका जोडप्याच्या रुपात पोज देतांनाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
अर्जुन कपूरने जांभळ्या रंगाची कोर्ट पॅन्ट आणि काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. यासोबतच त्याने सनग्लासेस लावला होता. या लूकमध्ये अर्जुन कमालीचा दिसत होता. तर मलायकाने काळ्या रंगाचा लाँग लाइनचा ड्रेस घातला आहे आणि तिचे केस पोनीटेलमध्ये बांधलेले होती. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.
मात्र यावेळी मलायकाचा हा ड्रेस पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना आता उर्फी जावेदची आठवण आली आहे. कारण तिचा हा आउटफिटशी हा उर्फी जावेदने काही महिन्यांपूर्वी परिधान केलेल्या गाऊन सारखाच आहे.
मलायका अरोराने कमीतकमी मेकअपसह ब्रेसलेटसह तिच्या लुकला पूरक केले. मलायकाच्या फोटोंवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी तिच्या फिटनेसचं कौतुक केलयं तर काहींनी तिच्या सौदर्यांच ... मात्र त्यात काहींनी तिला ट्रोलही केलं आहे. कमेंट करताना एका यूजरनं तिला, उर्फीची आई म्हटलंय तर दुसऱ्या यूजरने लिहिले की उर्फी तिला फॉलो करत असल्याचं सागंतिलयं.
तर काहींनी तिला आणि अर्जूनच्या जोडीलाही ट्रोल केलं आहे. मलायका आणि अर्जुन कपूर यांचे वैयक्तिक आयुष्य शक्य तितके खाजगी ठेवण्याचा प्रयत्न करतात. या व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रचंड ट्रोल झाला आहे.