Kartik Aaryan: शेहजादा आपटल्यानंतर कार्तिक बनणार 'पुलिसवाला'! फोटो शेअर करत म्हणाला, | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kartik Aaryan

Kartik Aaryan: शेहजादा आपटल्यानंतर कार्तिक बनणार 'पुलिसवाला'! फोटो शेअर करत म्हणाला,

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याने त्याच्या टॅलेंटच्या जोरावर इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे. तो मुलींचा क्रश बनला आहे. कार्तिक आर्यनने त्याच्या छोट्या करिअरमध्ये अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

कार्तिक आर्यनला त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी चाहते खूप आवडतात. नुकतच त्याने अभिनेत्याबरोबरच निर्माता म्हणुन देखील शेहजादामध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात त्याचासोबत क्रितीही होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकला नाही. हा चित्रपट साउथच्या अल्लू अर्जूनच्या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक होता.

तरीही या चित्रपटाच्या फ्लॉप होण्याने कार्तिकच्या करिअरवर याचा फारसा काही परिणाम झालेला दिसत नाही. निर्माते त्यांला त्यांच्या चित्रपटांमध्ये घेण्यास उत्सुक आहेत. दरम्यान, कार्तिक आर्यनने त्याच्या पुढील प्रोजेक्टची माहिती त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. आता तो त्याच्या पुढच्या चित्रपटाच्या शुटिंगला सुरवात केली आहे.

कार्तिक आर्यनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कार्तिक आर्यनचा फोटो पोलिसांच्या बॅजवर दिसत आहे. ज्यावर प्रोटीन पोलीस असे लिहिले आहे आणि कार्तिक आर्यनचे स्पेशल एजंट म्हणून उल्लेख केला आहे.

यासोबतच कार्तिक आर्यनने यासोबत कॅप्शन लिहिले आहे, 'माझ्या पुढच्या मिशनसाठी सज्ज.' कार्तिक आर्यनच्या या पोस्टनंतर त्याचे चाहते चांगलेच उत्साहित झाले आहेत. मात्र कार्तिक आर्यनचा हा पुढचा चित्रपट आहे की तो जाहिरात शूट करणार आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही.

कार्तिक आर्यनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झालं तर तो 'सत्यप्रेम की कथा' , 'आशिकी 3' आणि 'कॅप्टन इंडिया' चित्रपटात काम करताना दिसणार आहे. कार्तिक आर्यन शेवटचा 'शेहजादा' चित्रपटात दिसला होता.