मलायका अर्जुन कपूरची लगीनघाई? अभिनेत्रीचं मोठं प्लॅनिंग|Malaika Arora Arjun Kapoor Wedding Date | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Malaika And Arjun Kapoor

मलायका अर्जुन कपूरची लगीनघाई? अभिनेत्रीचं मोठं प्लॅनिंग

Malaika Arora on Wedding with Arjun Kapoor: बॉलीवूडची सर्वाधिक प्रसिद्ध जोडी म्हणजे मलायका आणि अर्जुन कपूर सोशल मीडियावर नेहमीच चर्चिली जाणारे सेलिब्रेटी आहे. सोशल (Social media viral news) मीडियावर देखील त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या काही वर्षांपासून अर्जुन कपूर आणि मलायका हे एकमेकांना डेट करत आहे. ते लिव्ह इन (bollywood actress) रिलेशनशिपमध्ये राहत आहे. आता ते लग्न करणार असल्याची बातमी व्हायरल झाली आहे. अभिनेत्री मलायकानं याबाबत खास प्लॅनिंग सुरु केल्याचं सांगण्यात (bollywood News) आलं आहे. अर्जुनच्या घरात नुकतंच रणबीर आणि आलियाचं लग्न पार पडलं. त्यानंतर तो आता त्याच्या लग्नाच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. मलायकानं आगामी काळात लग्नाचं नियोजन असल्याचं सांगत त्याच्या तयारीला सुरुवातही केली आहे. त्यामुळे या दोन्ही सेलिब्रेटींच्या चाहत्यांना कमालीचा आनंद झाला आहे.

आतापर्यत बॉलीवूडमध्ये अनेक सेलिब्रेटींचं ग्रँड सेलिब्रेशन झाले आहे. आणि येत्या काळात होणार आहे. विकी - कतरिना, रणबीर आलिया यांच्या लग्नानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला. सिद्धार्थ मल्होत्रा कियारा अडवाणी हे देखील येत्या काळात लग्नबंधनात अडकणार असल्याचे कळते आहे. भलेही त्यांच्या ब्रेक अपच्या बातम्या चाहत्यांसाठी धक्कादायक असल्या तरीही त्या दोन्ही सेलिब्रेटींकडून अद्याप त्याबाबत कोणत्याही प्रकारचा खुलासा करण्यात आलेला नाही. मलायकानं तिच्या लग्नाबाबत जाहिरपणे सांगितले असून आम्ही दोघे त्यावर विचार करत असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मलायकानं सांगितलं की, आम्ही एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. आमच्या चाहत्यांना आम्ही लग्न करावं असं वाटणं साहजिकच आहे. त्याची चर्चा आहे. आम्ही सध्या अशा जागी आहोत जिथे यापुढील काळात काय करायला हवे याचा विचार व्हायला पाहिजे. त्यामुळे लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे नियोजनही सुरु केले आहे. येत्या काळात त्याविषयीची अधिक माहिती तुमच्यापर्यत येईलच. एकमेकांची चांगली ओळख झाली आहे. आमचे विचारही सारखेच आहेत. त्यामुळे आता वेगळं नातं निर्माण करावं असं वाटू लागलं आहे असेही मलायकानं म्हटलं आहे.

हेही वाचा: Poster Viral: 'हरिओम' मधले ते दोन मावळे आहे तरी कोण?

Web Title: Malaika Arora Arjun Kapoor Wedding Date Bollywood Star Celebrity Ready To Married

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top