Malaika -Arjun : 'बेबी मी कायमच तुझ्या पाठीशी'! अर्जुननं मलायकाला विश करत ब्रेक अपच्या चर्चांना दिला पूर्णविराम

मलायकानं चाळीशीचा टप्पा कधीच पार केला आहे हे तिच्याकडे पाहिल्यावर कळून येत नाही.
Malaika Arora Happy Birthday Arjun Kapoor insta
Malaika Arora Happy Birthday Arjun Kapoor instaesakal

Malaika Arora Happy Birthday Arjun Kapoor insta : बॉलीवूडची सर्वात लोकप्रिय जोडी म्हणून मलायका आणि अर्जून कपूर यांच्याकडे पाहिले जाते.गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ हे दोन्ही सेलिब्रेटी एकमेकांना डेट करत आहेत. आज मलायकाचा जन्मदिवस. त्यानिमित्तानं तिच्या हजारो चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या सगळ्यात अर्जून कपूरची प्रतिक्रिया नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

मलायकानं चाळीशीचा टप्पा कधीच पार केला आहे हे तिच्याकडे पाहिल्यावर कळून येत नाही. इतकी ती अजुनही फिट आहे. त्यामुळेच की काय आजही बॉलीवूडमधील सर्वाधिक बोल्ड अन् ब्युटीफुल अभिनेत्रींमध्ये तिचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. मलायकानं प्रचंड संघर्ष करत तिच्या नावाची वेगळी ओळख तयार केली आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ तिनं मॉडेल, अभिनेत्री, डान्सर म्हणून भूमिका पार पाडली आहे.

Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

बॉलीवूडमध्ये फिटनेस फ्रीक म्हणूनही मलायकानं आपल्या नावाची क्रेझ तयार केली आहे. त्यामुळेच की काय राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध ब्रँडची ती अॅम्बेसिडर आहे. अशातच मलायका ही अनेक कारणांमुळे चर्चेतही राहिली आहे. तिला तिच्या वैयक्तिक कारणामुळे ट्रोल व्हावे लागले आहे. यात पहिले कारण म्हणजे तिचा घटस्फोट, दुसरं कारण म्हणजे अर्जून कपूरसोबतची तिची मैत्री, आणि तिचं लांबलेलं दुसरं लग्न. यामुळे मलायका चर्चेत राहिली आहे.

काही दिवसांपूर्वी मलायका आणि अर्जून कपूरचं ब्रेक अप झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे दोन्ही सेलिब्रेटींच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आज मलायकाच्या जन्मदिनाच्या निमित्तानं अर्जूननं जी पोस्ट केली आहे त्यामुळे अखेर त्या ब्रेक अपच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. या वर्षी डिसेंबर अखेर मलायकानं लग्नाचे संकेत दिले होते. त्यानंतर मात्र अचानक त्यांच्या ब्रेक अपच्या बातम्यांना उधाण आले.

Malaika Arora Happy Birthday Arjun Kapoor insta
Ganapath Movie Review : टायगरच्या माकडउड्यांचा 'फुसका गणपत', आजारी पडलेली कथा अन् बरचं काही!
arjun kapoor and malaika
arjun kapoor and malaika

आता अर्जूननं मलायकाला शुभेच्छा देणारी पोस्ट इंस्टावरुन व्हायरल केली आहे.त्यात त्यानं लव यु म्हणत, मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. असे म्हणणारी पोस्ट शेयर केली आहे. त्यावर मलायकानं देखील लव यु बेबी असे म्हणत अर्जून सोबत आपलं सगळं आलबेल असल्याचे संकेत दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com