esakal | वयाच्या ४७व्या वर्षी मलायकाला व्हायचंय आई
sakal

बोलून बातमी शोधा

malaika arora

वयाच्या ४७व्या वर्षी मलायकाला व्हायचंय आई

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

बॉलीवूडमधील हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. सध्या मलायका 'सुपर डान्सर चॅप्टर ४.’(super dancer) या शो मध्ये वेगळ्या भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वी सुपर डान्सर या कार्यक्रमातील परिक्षक शिल्पा शेट्टीच्या कुटुंबातील व्यक्तींना कोरोना झाल्यामुळे तिला शो मधून रिप्लेस करण्यात आले होते. शिल्पाच्या जागी मलायका शो मध्ये परिक्षक म्हणून काम करत होती. या शो मधील एका भागात स्पर्धक असलेल्या अंशिका राजपूतचा डान्स मलायकानं पहिला. हा डान्स पाहून तिने मोठा खुलासा केला.(malaika arora planning to having a baby girl)

अंशिकाचा डान्स पाहून मलायका म्हणाली, 'मला एक मुलगी हवी’ त्याचे कारण तिने सांगितले की, तिच्या आजूबाजूला सगळे पुरुष आहेत. त्यामुळे तिला मुलीची ओढ आहे. तिला मुलीसोबत मेकअप, कपडे, शूज शेअर करायचे आहेत असे तिने सांगितले.मलायकाची इच्छा ऐकून शोमधील परिक्षक गीता कपूर भावूक झाली. गीता म्हणाली, 'लवकरात लवकर मलायका एका मुलीची आई होऊ दे'. यावर मलायका म्हणाली,' गीता तुमच्या तोंडात साखर पडो. मला मुलगी होऊ दे किंवा माझी मनापासून इच्छा आहे की मी एका मुलीला दत्तक घ्यावे'.

मलायका ४७ वर्षांची असून तिला १९ वर्षांचा मुलगा आहे. तिच्या मुलाचे नाव अरहान खान असे आहे.अभिनेता अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.