मलाईका अरोराने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चाहत्यांना दिसली लग्नाची तारीख?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

व्हिडिओमध्ये ती बीचवर गोल गोल फिरताना दिसतेय.. यात रेतीवर काहीतरी लिहिलेलं दिसतंय ज्याचे अनेक तर्कवितर्क चाहते काढत आहेत.

मुंबई- मलाईका अरोरा सध्या लॉकडाऊनमध्ये घरी आहे. म्हणूनंच तिला तिचे फिरण्याचे दिवस आठवत आहेत. मलाईकाने तिचा एक जुना व्हिडिओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती बीचवर गोल गोल फिरताना दिसतेय.. यात रेतीवर काहीतरी लिहिलेलं दिसतंय ज्याचे अनेक तर्कवितर्क चाहते काढत आहेत.

हे ही वाचा:  बोनी कपूर मुली जान्हवी, खुशीसह क्वारंटाईन, घरातील नोकर निघाला कोरोना पॉझिटीव्ह

मलाईका अरोराने एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. तीचा बीच खूप आवडतात त्यामुळे ती अनेकदा तीचे सुट्टीतले बीचवरचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. कोरोनामुळे सध्या कोणीच घराबाहेर जाऊ शकत नाहीये त्यामुळे फिरण्याच्या दिवसांची आठवण आल्यामुळे मलाईकाने तिचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे. 

मलाईकाने हा व्हिडिओ पोस्ट करत एक कॅप्शन देखील दिलं आहे. उन्हाच्या प्रकाशात फिरत आहे, मी माझी पाऊलं पुढे टाकत आहे की मी जिथून आली आहे तिथे मला परत जायचे आहे. जग देखील या नियंत्रणाबाहेरील चक्कर मध्ये फिरुन पुन्हा इथेच येईल आणि मग आशा आणि आनंदाचा सूर्य पुन्हा आपल्या सगळ्यांना दिसेल. मलाईकाचा हा व्हिडिओ अनेक लोकांनी लाईक केला आहे. मात्र या व्हिडिओमध्ये जी रेती दिसतेय त्या रेतीवर काहीतरी लिहिलं आहे. त्या रेतीवर काय लिहिलं आहे याचे अनेक तर्क वितर्क चाहते काढत आहेत. 

रेतीवर 'सेव्ह द डेट' असं काहीतरी लिहिलेलं दिसतंय. आणि त्याखाली एक तारीख असल्याचा अंदाज लोक बांधत आहेत. यावर अनेकजण ही मलाईकाच्या लग्नाची तारीख तर नाही ना याविषयी सोशल मिडीयावर चर्चा करत आहेत. मलाईका अरोरा अर्जुन कपूरसोबत अफेअरमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. या दोघांनी अजुन काही स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी सोशल मिडियावर ते अनेक हिंट देताना दिसून येतात.   

malaika arora posts old beach video with positive caption  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: malaika arora posts old beach video with positive caption