'मूव्हिंग इन विथ मलायका' शो ची का रंगलीय इतकी चर्चा, मलायका म्हणाली...Malaika Arora | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Malaika Arora show- Moving in with malaika

Malaika Arora: 'मूव्हिंग इन विथ मलायका' शो ची का रंगलीय इतकी चर्चा, मलायका म्हणाली...

Malaika Arora: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिच्या नवीन शो 'मूव्हिंग इन विथ मलायका'मुळे चर्चेत आहे. मलायका अरोरा या शोमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसते आहे. या शोमध्ये मलायका अरोरा अतिशय वेगळ्या अंदाजात दिसत आहे. या तिच्या रिअॅलिटी शो मध्ये मलायका अरोराने शोचा खरा अर्थ काय आहे हे देखील स्पष्ट केले आहे.(Malaika Arora show- Moving in with malaika)

हेही वाचा: Marathi Movie: 'अवतार 2' नं केला सोनालीच्या 'व्हिक्टोरिया' चा गेम, आपल्याच घरातून मराठी सिनेमा हद्दपार

मलायका म्हणाली, “मला हा शो महत्त्वाकांक्षी असावा असे वाटते. हा काही इकडच्या-तिकडच्या निरर्थक गप्पांचा शो नाही. मला फक्त अशा गोष्टींबद्दल बोलायचे आहे ज्या आपण कधी उघडपणे बोलू शकत नव्हतो. लोक मला फॅशन दिवा समजतात , काही मॉडेल मला त्यांची आयकॉन मानतात ,पण माझी एक बाजू आहे ती शांत आहे.” 'मुव्हिंग इन विथ मलायका' या शोमध्ये मलायकाला तिचे आयुष्य बिनधास्तपणे लोकांसमोर आणायचे आहे.

हेही वाचा: Bigg Boss Hindi: हे फक्त सलमानलाच जमेल..., बिग बॉसच्या घरातील दबंग खानच्या 'या' खास क्षणांनी चोरलं काळीज

मूव्हिंग इन विथ मलायका या शो मुळे मलायकाचे ओटीटीवर पदार्पण झाले आहे. मलायकाच्या शोमध्ये तिची कॉमेडियन-मैत्रीण भारती सिंगने देखील हजेरी लावली , भारतीने त्या लोकांना खडेबोल सुनावले जे सहसा मलायकाला तिचे वय, काम, शरीर याबद्दल इन्स्टाग्रामवर ट्रोल करतात. मलायकाच्या शो मध्ये नोरा फतेही देखील आली होती. तेव्हा देखील दोघींनी एकमेकींविषयीची मतं बिनधास्त शो मध्ये ऐकवली.

मुव्हिंग इन विथ मलायका या शोमध्ये मलायकानं चित्रपट निर्माती फराह खानला देखील निमंत्रित केलं होतं. या शो मध्ये मलायकानं स्वतःच्या आयुष्याविषयी बोलताना नुकत्याच झालेल्या कार अपघाता बद्दल सांगितले. शिवाय पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान आणि अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या नातेसंबंधांबद्दल देखील खुलासे केले. तिने स्टँड-अप कॉमेडीमध्येही हात आजमावला आणि शिवाय स्वतः बद्दल आणि तिच्या बहीणबद्दलही अनेक गोष्टी शेअर केल्या. ती या शो मध्ये चित्रपट निर्माता करण जोहरलाही भेटली. ज्याच्यासोबत तिने सेलिब्रिटींच्या सेक्स लाइफविषयी मोकळेपणानं भाष्य केलं.

हेही वाचा: Pathan: व्हायरल झालं वादग्रस्त 'बेशरम रंग' गाण्याचं 'देसी व्हर्जन', नाचणाऱ्या मुलापुढं दीपिकाही पडली फिकी

मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. दोघांनी 2019 मध्ये त्यांचे नाते अधिकृत केले. आता त्यांचे चाहते दोघांच्या लग्नाची चातकासारखी वाट पाहत आहेत.