Bigg Boss Hindi: हे फक्त सलमानलाच जमेल..., बिग बॉसच्या घरातील दबंग खानच्या 'या' खास क्षणांनी चोरलं काळीज

बिग बॉस हिंदीच्या प्रत्येक सिझनमध्ये सलमानचं कोणत्या ना कोणत्या स्पर्धकासोबत खास कनेक्शन राहिलं..अनेकदा तो हळवा होताना दिसला.
Bigg Boss Hindi, Salman Special  moment with contestants
Bigg Boss Hindi, Salman Special moment with contestantsGoogle

Bigg Boss Hindi: सलमान खानचा सर्वात लोकप्रिय नॉन-फिक्शन टेलिव्हिजन रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस' हा ड्रामा, विनोदाने भरपूर असून मनोरंजनाचा केंद्रबिंदू बनला आहे. तसेच, या शोला प्रेक्षकांचा नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच, अनेक चढ-उतारांसह, सलमान खान बिग बॉसच्या घरात एक सक्षम होस्ट म्हणून उदयास आला अन् त्यानं नेहमीच त्यामाध्यमातून खऱ्याची बाजू घेतलेलं दिसून आलं आहे. अलीकडेच 16व्या सीझनमध्ये प्रवेश केलेल्या या शोने टेलिव्हिजनच्या दुनियेत खूप मोठा पल्ला गाठत प्रेक्षकांना खरोखरच काही संस्मरणीय क्षण दिले आहेत. चला,जाणून घेऊया शो मधील काही हळव्या क्षणांविषयी. (Bigg Boss Hindi, Salman Special moment with contestants)

Bigg Boss Hindi, Salman Special  moment with contestants
Welcome 3: उदय भाई आणि मजनू भाई यावेळी देणार देशभक्तीचा डोस..आर्मी ऑफिसर्सकडून घेणार ट्रेनिंग

सलमान खानने अब्दु रोजिकसाठी खास भेटवस्तू आणली

हा क्षण बिग बॉस 16 मध्ये टिपला गेला जेव्हा सलमान खानने अब्दु रोजिकसाठी भेटवस्तू आणली. जेव्हा अब्दुने बॉक्स उघडून त्यातील लहान डंबेल पहिले तेव्हा अब्दु खूप आनंदी झाला होता. तसेच, या एपिसोडमध्ये आणखी काही मजेशीर क्षण पाहायला मिळाले जेव्हा मस्करी करत सलमान खानने शोच्या महिला कलाकारांना प्रभावित करण्यासाठी कसरत करावी असे अब्दूला म्हणाला.

Bigg Boss Hindi, Salman Special  moment with contestants
Avatar 2 Twitter Review: अफाट..अद्भूत..अचाट..'अवतार 2 ' पाहून भारावलं पब्लिक!

सलमान खानला घर साफ करताना पहायला मिळाले

'बिग बॉस' सीझन 13 मधील या घटनेने स्पर्धक आणि दर्शकांना धक्का बसला होता. या घटनेत स्पर्धकांच्या अस्वच्छतेपायी सलमान खानने स्वतः घरात एन्ट्री केली. तसेच, त्याने स्वयंपाकघरातील भांडी आणि बाथरूम साफ केले. या घटनेनंतर स्पर्धक सुपरस्टारची माफी मागताना दिसले.

Bigg Boss Hindi, Salman Special  moment with contestants
Nora Fatehi: जॅकलिन विरोधात मानहानीचा दावा केल्यानंतर नोरानं आता पोस्टमधून अभिनेत्रीला झापलं, म्हणाली...

सलमान खानने दिवंगत सिद्धार्थ शुक्लाला वाहिली श्रद्धांजली

बिग बॉस 15 मधील हा एक हृदयस्पर्शी क्षण आहे जेव्हा सुपरस्टार सलमान खानने बिग बॉस 13 चा विजेता दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली वाहिली. सलमान खानने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासाठी भावनिक भाषण देऊन शोची सुरुवात केली. दरम्यान शोमध्ये "सिद्धार्थ शुक्लाची जागा कोणी घेऊ शकत नाही" असे म्हणताना दिसला.

Bigg Boss Hindi, Salman Special  moment with contestants
Marathi Movie: 'अवतार 2' नं केला सोनालीच्या 'व्हिक्टोरिया' चा गेम, आपल्याच घरातून मराठी सिनेमा हद्दपार

जेव्हा सलमान खानला 'टाइम आऊट' म्हणाला इमाम सिद्दीकी

सीझन 6 मधील हा क्षण कदाचित सर्वात धक्कादायक क्षण होता जेव्हा इमाम सिद्दीकीनी सलमान खानला संभाषणा दरम्यान "टाइम आउट" करण्यास सांगितले. जेव्हा इमामला त्याच्या सहकारी स्पर्धकांपैकी एकाला नॉमिनेट करण्यास सांगितले गेले, ज्याने सलमानच्या वारंवार आठवण करून देण्याकडे लक्ष दिले नाही ज्यामुळे तो नाराज झाला. पण इमामने सलमानला 'टाइम आऊट' सांगितल्यावर त्याचा संयम सुटला आणि त्यानंतर सलमान डिझायनरला ओरडला.

Bigg Boss Hindi, Salman Special  moment with contestants
Prakash Raj: सेटवर कसा वागतो सलमान?, खुलासा करत प्रकाश राज म्हणाले,'तो सर्वांनाच आल्या आल्या बोलतो की...'

सलमान खानने रश्मी देसाईची काउंसलिंग केली

हा क्षण सीझन 13 मध्ये दिसला जेव्हा सलमान खान स्वतः रश्मी देसाईचे सांत्वन करण्यासाठी घरात दाखल झाला होता. जेव्हा सलमान खानने अरहान खानबद्दल खुलासा केला तेव्हा रश्मीने प्रपोजल स्वीकारले असले तरी सत्य हाताळणे तिला खूप कठीण झाले. यामुळे सलमान घरात एन्ट्री करत रश्मीला मिठी मारून समजावताना दिसला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com