महिलेचं लैंगिक शोषण करुन दुबईला पळून गेलेल्या मल्याळम अभिनेत्याला अटक Vijay Babu | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Malayalam actor Vijay Babu

महिलेचं लैंगिक शोषण करुन दुबईला पळून गेलेल्या मल्याळम अभिनेत्याला अटक

दाक्षिणात्य अभिनेता(South Actor) विजय बाबू(VIjay Babu) ला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर एप्रिल,२०२२ मध्ये एका महिलेनं लैंगिक शोषण(Sexual Assault) केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांत तक्रारही नोंदवली गेली होती. आता जेव्हा अभिनेता एर्नाकुलम पोलिसांसमोर उपस्थित राहिला तेव्हा सोमवारी २७ जून रोजी त्याला अटक करण्यात आली. बातमी आहे की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या टीमला ३ जुलै रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत विजय बाबूची चौकशी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.(Malayalam actor Vijay Babu arrested in sexual assault case)

हेही वाचा: वचनपूर्ती...सरबजीत बनून रणदीप हुड्डानं दिला दलबीर कौरच्या पार्थिवाला खांदा

विजय बाबू हा मल्याळम सिनेमाचा अभिनेता असण्यासोबतच निर्माता देखील आहे. त्याच्यावर लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप एका महिलेनं लावला आहे. त्या महिलेनं एर्नाकुलमच्या दक्षिण पोलिस ठाण्यात जाऊन अभिनेत्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केलं होतं. त्याचवेळी विजय बाबूनं जामिनासाठी केरळ हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर कोर्टानं त्याच्या याचिकेवर मंजुरी देखील दिली होती. पण आता विजय बाबूला पोलिसांनी अटक केली आहे.

विजय बाबू विरोधात जेव्हा तक्रार नोंदवली गेली होती तेव्हा त्यानंतर तो दुबईत पळून गेल्याचं वृत्त आहे. जून मध्ये अभिनेता भारतात परत आला आहे. लैंगिक शोषणा व्यतिरिक्त विजयवर आणखी काही आरोपही पीडित महिलेनं लावले आहेत. फेसबुक लाइव्हमध्ये विजय बाबूनं या प्रकरणावर चुप्पी तोडत सगळे आरोप खोटे असल्याचं म्हटलं होतं. सोबत त्या महिलेवर मानहानीची केस करण्या संदर्भातही भाष्य केलं होतं. पण लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर आता अभिनेत्याला AMMA च्या एक्झिक्युटिव्ह कमिटीमधील पदावरुन पायउतार करण्यात आलं आहे. कमिटीचे प्रवक्ता एडावेला बाबू यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये सांगितलंय की ते विजय बाबू विरोधात कोर्टात जाऊन अॅक्शन घेणार आहेत.

Web Title: Malayalam Actor Vijay Babu Arrested In Sexual Assault

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..