बॅटमिंटन खेळताना आला हार्ट ऍटॅक, अभिनेत्याचं वयाच्या ४३ व्या वर्षी निधन

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 18 September 2020

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सबरी नाथ यांचं गुरुवार १७ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ४३ वर्षांचे होते.

मुंबई- मनोरंजन विश्वाला २०२० हे वर्ष अनलकी ठरतंय. अनेक सेलिब्रिटींनी या वर्षात जगाचा निरोप घेतल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. आता मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीमधुन एक वाईट बातमी येत आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सबरी नाथ यांचं गुरुवार १७ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ४३ वर्षांचे होते. त्यांना त्रिवेंद्रममधील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

हे ही वाचा: श्रावणी आत्महत्या प्रकरणातील तिसरा फरार आरोपी तेलुगु सिनेनिर्माता पोलिसांना आला शरण

'मिन्नुकेतु', 'अमाला' आणि 'स्वामी अयप्पन' सारख्या मल्याळम टीव्ही शोचा भाग असलेल्या सबरी नाथ यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुली आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार सबरीनाथ जेव्हा बॅटमिंटन खेळत होते तेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना लगेचच जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 

सबरी नाथ यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात 'मिन्नुकेतु' या शोमधून केली होती. या शोमधील आदित्यनच्या मुख्य भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले होते. सबरीनाथ यांच्या निधनाने संपूर्ण मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोकाकुल वातावरण आहे. त्यांच्या अनेक सहकलाकारांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.   

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Cant believe RIP

A post shared by Archana Suseelan (@archana_suseelan) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by mumanair@gmail.com (@umanair_actress.official) on

 

malayalam tv actor sabari nath passes away due to cardiac arrest while playing badminton industry in deep shock  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: malayalam tv actor sabari nath passes away due to cardiac arrest while playing badminton industry in deep shock