esakal | अभिनेत्री श्रावणी आत्महत्या प्रकरणातील तिसरा फरार आरोपी तेलुगु सिनेनिर्माता पोलिसांना आला शरण
sakal

बोलून बातमी शोधा

actress sravani

८ सप्टेंबरला टीव्ही अभिनेत्री श्रावणीने हैद्राबाद येथील मधुरनगर येथील तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती.  या प्रकरणातील इतर दोन मुख्य आरोपी देवराज रेड्डी आणि साईकृष्णा रेड्डी आधीपासूनंच पोलिसांच्या ताब्यात आहेत.

अभिनेत्री श्रावणी आत्महत्या प्रकरणातील तिसरा फरार आरोपी तेलुगु सिनेनिर्माता पोलिसांना आला शरण

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- टीव्हा अभिनेत्री श्रावणी कोंडपल्ली आत्महत्या प्रकरणातील तिसरा आरोपी तेलुगु सिनेनिर्माता अशोक रेड्डी हैद्राबाद पोलिसांना शरण आला आहे. पंजागुट्टाचे एसीपी तिरुपट्टनाने त्यांना ताब्यात घेतलं आहे. ८ सप्टेंबरला टीव्ही अभिनेत्री श्रावणीने हैद्राबाद येथील मधुरनगर येथील तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. 

हे ही वाचा: सौरव गांगुलीने त्याच्या बायोपिकमध्ये काम करण्यासाठी हृतिक रोशनसमोर ठेवली 'ही' अट  

आरोपी अशोक रेड्डी यांची सर्वात आधी ओस्मानिया हॉस्पिटलमध्ये कोविड टेस्ट केली जाईल. मेडिकल एग्जामिनेशननंतर अशोक रेड्डीला पोलिसांद्वारे कोर्टात सादर केलं जाईल. या प्रकरणातील इतर दोन मुख्य आरोपी देवराज रेड्डी आणि साईकृष्णा रेड्डी आधीपासूनंच पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिस रिमांड कॉपीमध्ये दाखल केलेल्या माहितीनुसार हे तीनही आरोपी छळ करत असल्याने श्रावणीने आत्महत्या केली होती. 

अशोक रेड्डी RX 100 चे निर्माते आहेत ज्यामध्ये एसएस कार्तिकेय आणि पायल राजपूत यांनी मुख्य भूमिका साकारली होती. श्रावणीच्या कुटुंबाने तिच्या आत्महत्येमागे कोणाचंतरी कारस्थान असल्याची शंका व्यक्त केली होती. 

श्रावणीच्या भावाने मिडियाशी बोलताना सांगितलं की, 'माझ्या बहिणीने मला सांगितलं होतं की ती खूप दबावाखाली आहे कारण तिला ब्लॅकमेल केलं जातं होतं. त्याने सांगितलं की शूटींग सुरु करायची होती मात्र त्याआधीच तिने हे टोकांचं पाऊल उचललं.'

श्रावणीने अनेक टीव्ही शोमध्ये जवळपास ८ वर्ष काम केलं आहे. 'मनसु ममता' आणि 'मौनुनारगम' सारखे शो केल्यानंतर ती खूप चर्चेत आली होती.     

sravani kondapalli suicide telugu film producer ashok reddy surrenders hyderabad police