कॉमेडियन मल्लिका दुआला मातृशोक

डॉ. पद्मावती दुआ यांची कोरोनाशी झुंज अयशस्वी
mallika dua mother chinna dua
mallika dua mother chinna duaInstagram

अभिनेत्री आणि कॉमेडियन मल्लिका दुआची Mallika Dua आई डॉ. पद्मावती दुआ यांचे कोरोनाने निधन झाले. त्या चिन्ना दुआ Chinna Dua म्हणून ओळखल्या जायच्या. मे महिन्यात मल्लिकाच्या आईवडिलांना कोरोनाची लागण झाली होती. या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मल्लिकाने आईवडिलांना आयसीयू बेड मिळवण्यासाठी ट्विटरवर मदत मागितली होती. रुग्णालयात बेड मिळाल्यानंतर तिने मदत करणाऱ्यांचे आभारही मानले होते. चिन्ना दुआ यांनी १५ मे रोजी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती होती. मल्लिकाच्या अनेक व्हिडीओमध्ये त्या झळकल्या होत्या. (Mallika Duas mother Chinna Dua dies after long fight against Covid 19)

'१३ मे रोजी मला श्वास घेण्यास त्रास झाला होता. उपचारासाठी सेंट स्टिफन रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मला आयसीयू बेडची गरज असल्याचं समजलं. या रुग्णालयात ती व्यवस्था नसल्याने मी आणि विनोद दुआ मेंदाता रुग्णालयात दाखल झालो. आम्हा दोघांनाही बरं होण्यासाठी थोडा वेळ लागेल. तुमच्या प्रार्थना आमच्यासोबत राहुद्यात', अशी पोस्ट चिन्ना दुआ यांनी लिहिली होती. त्यानंतर आईसाठी टॉसिलीझुमाब Tocilizumab या औषधाची तातडीने गरज असल्याची पोस्ट मल्लिकाने ट्विटरवर लिहिली होती. तिच्या या पोस्टनंतर भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी औषधांची व्यवस्था केली.

अभिनेत्री आणि नेत्या बिना खान, पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित चिन्ना दुआ यांना श्रद्धांजली वाहिली. चिन्ना या सोशल मीडियावर खूप सक्रिय असायच्या आणि साड्यांसाठी असलेलं त्यांचं प्रेम त्यांच्या पोस्टमधून अनेकदा झळकायचं. त्यांच्या निधनाच्या वृत्तावर विविध स्तरांतील नामवंत लोकांकडून शोक व्यक्त होतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com