माझा त्यांनी मानसिक छळ केला', 'मर्डर गर्ल' मल्लिका शेरावतचा खळबळजनक आरोप Mallika Sherawat | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mallika Sherawat recalls industry 'mentally torturing' her

'माझा त्यांनी मानसिक छळ केला', 'मर्डर गर्ल' मल्लिका शेरावतचा खळबळजनक आरोप

बॉलीवूड(Bollywood) अभिनेत्री मल्लिका शेरावत(Mallika Sherawat) हिची गणना बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते. 'मर्डर' सिनेमात तिच्या बोलडनेसचा कहर आपण सर्वांनीच पाहिला असेल. काही दिवसांपूर्वी मल्लिकाने एका मुलाखतीत फिल्म इंडस्ट्रीविषयी मोठा खुलासा केला आहे. तिनं फिल्म इंडस्ट्री आणि मीडियाच्या एका ग्रुपवर आरोप केला आहे की, यांच्याकडून तिचा मानसिक छळ करण्यात आला. आणि म्हटलं की,''हे लोक फक्त तिचं शरीर आणि ग्लॅमरवरच त्यावेळी फोकस करायचे,तिच्या अभिनयाविषयी कोणीच काही बोललं नाही''.(Mallika Sherawat recalls industry 'mentally torturing' her)

हेही वाचा: '२४ इंचाची कंबर अन् ३६ इंचाची छाती', काजोलचा बॉलीवूडला चिमटा

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीनं गेल्या २० वर्षात तिनं साकारलेल्या वेगवेगळ्या भूमिकांविषयी बातचीत केली आहे. ती म्हणालीय,''पहिल्यातील अभिनेत्रींना खूप चांगलं दाखवलं जायचं. सती-सावित्री सारख्या एकदम साध्या-सरळ स्वभावाच्या त्या सिनेमात वावरायच्या. त्यानंतर व्हॅम्प आल्या,म्हणजेच खलनायिकेचाच एक प्रकार. अशा दोन पद्धतीच्या व्यक्तीरेखाच तेव्हा अभिनेत्रींसाठी असायच्या. आता जो बदल पहायला मिळतो,तो महिलांना खऱ्या आयुष्यात स्त्री जशी जगते तसं जगायचा अनुभव देतो. ती खुश किंवा उदास पहायला मिळते. आज सिनेमातील अभिनेत्री चुका करताना दिसते पण एवढं सगळं करुनही प्रेक्षक अशा व्यक्तीरेखांना डोक्यावर उचलून धरतं''.

मल्लिकानं आपल्या 'मर्डर' सिनेमातील व्यक्तीरेखेची तुलना दीपिकाच्या 'गहराइयां' सिनेमातील भूमिकेशी केली. मल्लिका पुढे म्हणाली,''अभिनेत्रींना आपल्या फिगरवर खूप आत्मविश्नास आहे. अभिनेत्रींच्या फिगरवरनं तेव्हा सगळीकडे बोलबाला झाला जेव्हा मी 'मर्डर' केला होता. तेव्हा लोक किस आणि बिकिनी संदर्भात खूप वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त झाले,खूप काही बोलले. दीपिकाने जे 'गहराइया' मध्ये केलं आहे ते मी १५ वर्षापूर्वी केलं आहे,पण तेव्हा लोकांचे विचार खूप संकुचित होते''. ती पुढे म्हणाली आहे की,''मला त्यावेळी बॉलीवूड इंडस्ट्रीतील काही जणांनी आणि मीडियाच्या एका ग्रुपने मानसिकरित्या खूप छळलं. ते केवळ माझं शरीर आणि ग्लॅमरवर बोलले,माझ्या अभिनयाविषयी त्यांनी एकही शब्द काढला नाही. मी 'दशावतरम','प्यार के साइड इफेक्ट्स','वेलकम' सिनेमात काम केलं आहे,पण कधीच कुणी माझ्या अभिनयाविषयी बोललं नाही''.

मल्लिका शेरावतच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर ती लवकरच 'Rk/RKAY' मध्ये दिसणार आहे. तिनं या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली आहे. या सिनेमात कुब्रा सैत,रणवीर शौरी, मनु ऋषि चड्ढा हे देखील मुख्य भूमिका साकरताना दिसणार आहेत. हा एक कॉमेडी ड्रामा असून २२ जुलै रोजी रिलीज होणार आहे. बॉक्सऑफिसवर या सिनेमाला टक्कर द्यायला रणबीर कपूरचा 'शमशेरा' देखील त्याच दिवशी रिलीज होत आहे.

Web Title: Mallika Sherawat Recalls Industry Mentally Torturing

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top