esakal | Mallika Sherawat : 'त्या चित्रपटासाठी माझी नैतिकदृष्ट्या हत्याच झाली'
sakal

बोलून बातमी शोधा

mallika sherawat

Mallika Sherawat : 'त्या चित्रपटासाठी माझी नैतिकदृष्ट्या हत्याच झाली'

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेत्री मल्लिका शेरावत Mallika Sherawat चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाते. करिअरच्या सुरुवातीलाच मल्लिकाने बोल्ड भूमिका स्वीकारल्या होत्या. त्यापैकीच एक चित्रपट होता 'मर्डर' Murder. मात्र या चित्रपटात काम केल्याचे परिणामही तिला भोगावे लागले होते. याबद्दल ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाली. 'मर्डर चित्रपटात बोल्ड सीन दिल्याने माझी नैतिकदृष्ट्या हत्याच झाली होती', असं ती म्हणाली. चित्रपट आणि प्रेक्षकांमध्ये कालांतराने बदल झाल्याचंही तिने यावेळी मान्य केलं. मल्लिकाने २००३ मध्ये 'ख्वाहिश' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर पुढच्याच वर्षी तिने 'मर्डर' चित्रपटात भूमिका साकारली होती. या दोन्ही चित्रपटांमध्ये तिने बोल्ड दृश्ये दिली होती. (mallika sherawat says she was almost morally assassinated for murder)

"२००४ मध्ये जेव्हा मी मर्डर या चित्रपटात भूमिका साकारली होती, तेव्हा त्यातील हॉट आणि बोल्ड दृश्यांसाठी माझी नैतिकदृष्ट्या हत्याच झाली होती. त्यावेळी मी चित्रपटांत केलेले सीन्स आता फार सामान्य वाटतात. आता लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे आणि आपला चित्रपटसुद्धा बदलला आहे", असं मल्लिका म्हणाली.

हेही वाचा: Shruti Haasan : 'बरं झालं आईबाबांनी घटस्फोट घेतला'

"मी आता जरी विचार केला तरी ५० आणि ६०च्या दशकातील चित्रपटांची तुलना होऊन शकत नाही. आपल्याकडे अनेक सुंदर अभिनेत्री होत्या, पण चित्रपटातील सौंदर्य तुलनेने कमी पडलं. दमदार भूमिका मिळण्यासाठी मी अनेक वर्षे वाट पाहिली", असं तिने पुढे सांगितलं.

अनुराग बासू दिग्दर्शित 'मर्डर' या चित्रपटात मल्लिकाने लग्नानंतर संसारात खूश नसलेल्या सिमरन या महिलेची भूमिका साकारली होती. यामध्ये मल्लिकासोबत अश्मित पटेल आणि इमरान हाश्मीने मुख्य भूमिका साकारल्या होत्या. मल्लिकाने त्यानंतर 'प्यार के साइड इफेक्ट्स', 'आप का सुरूर', 'वेलकम', 'डबल धमाल' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या.