esakal | अभिनेता केटीएस पदन्नियल यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

kts padannayil

अभिनेता केटीएस पदन्नियल यांचे निधन

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनयानं दाक्षिणात्य सिनेमांमध्ये (south industry) महत्वाची भूमिका साकारणाऱ्या केटीएस पदन्नियल यांचे निधन झाले आहे. ते 88 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचे इंदिरा गांधी नावाच्या रुग्णालयात निधन झाले आहे. वाढत्या वयाबरोबरच त्यांना वेगवेगळे आजारांनी जखडून ठेवले होते. (malyalam cinema actor kts padannayil passed away at 88 yst)

याबाबत रुग्णालयातील एकानं माहिती देताना सांगितले की, त्यांना कार्डियक युनिटमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांनी आज सकाळी सहा वाजता अखेरचा श्वास घेतला. दोन दशके आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या केटीएस यांचा चाहतावर्ग मोठा होता. त्यांच्या जाण्यानं दाक्षिणात्य सिनेमावर शोककळा पसरली आहे. केटीएस यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी असा परिवार आहे. पडनाईल यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात रंगभूमीवरून केली. त्यानंतर, ते चित्रपटांकडे वळले. त्यांनी १९९५ मध्ये ‘अनियन बावा चेतन बावा’ या मल्याळम चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर, १३ वर्षांच्या काळात अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.

हेही वाचा: रैनाच्या 'ब्राह्मण' वक्तव्यावरुन वाद; सोशल मीडियावर संताप

सुमारे ५० हून अधिक चित्रपटांतील विनोदी भूमिकांनी त्यांना ओळख मिळवून दिली. त्यांनी १०० हून अधिक मालिकांमध्येही काम केले. त्यांच्या जाण्यावर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि शिक्षणमंत्री वी शिवनकुट्टी यांनी आदरांजली वाहिली आहे. थिएटर आर्टिस्ट म्हणून केटीएस यांनी सुरुवात केली होती. 90 च्या दशकात ते मल्याळम चित्रपटांमध्ये ते सक्रिय होते. बावा चेटन बाबा हा त्यांचा पहिला चित्रपट होता.

loading image