369 गाड्यांचा मालक आहे साऊथ सुपरस्टार मामूटी; संपत्ती ऐकून चाट पडाल..

घरच्या गाड्यांसाठी स्वतःच गॅरेज उभरणारा हाक पहिलाच अभिनेता असेल..
Mammootty Birthday : Collection of ‘369' Cars Owned by Mammootty
Mammootty Birthday : Collection of ‘369' Cars Owned by Mammootty sakal
Updated on

Mammootty Birthday : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेते मामूटी (Mammootty) यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. मामूटी यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. ज्युनियर आर्टिस्ट ते सुपरस्टार होणं सोप्पं नव्हतं पण त्यांनी अत्यंत मेहनतीने हे करून दाखवलं. आजवर ४०० चित्रपट साकारणाऱ्या या महानायकाकडे ३६९ गाड्या आहे आणि कोट्यावधींची संपत्ती आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया मामूटी यांचा प्रवास..

मामूटी यांचा जन्म 7 सप्टेंबर 1951 रोजी केरळमधील चंपू गावात झाला. त्यांचे वडील तांदळाचा व्यवसाय करायचे आणि आई गृहिणी होती. मामूटी यांना सहा भावंडं. मामूटी यांनी शालेय शिक्षण पूर्ण करून सरकारी महाविद्यालयातून एलएलबी केले. त्याचवेळी आपण अभिनय करायला हवा असे त्यांच्या मनात आले आणि त्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला.

मामूटी यांनी १९७१ मध्ये 'अनुभवांगल पलीचकल' या चित्रपटात काम करुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात त्यांनी ज्युनिअर आर्टिस्टची भूमिका साकारली होती. त्यानंतर 1979 मध्ये 'देवलोकम' या चित्रपटात त्यांना मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'विकांदु स्वप्नांगल' या चित्रपटातही ते होते पण त्यांना खरी ओळख मिळाली ते 1981 मध्ये रिलीज झालेल्या 'मुन्नेट्टम' या चित्रपटामुळे.

मामूट्टी यांनी तामिळ, तेलगू, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड अशा 6 भाषांमधील जवळपास 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मामूटी यांना त्यांच्या अभिनयासाठी 3 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मामूटी 210 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. ही संपत्ती जरी कमी वाटत असली तरी त्यांच्याकडच्या गाड्या पाहुन कुणाचेही डोळे फिरतील. त्यांच्याकडे 369 गाड्या आहेत. मामूटी यांनी त्यांच्या कारसाठी स्वत:चे वेगळे गॅरेज बांधले आहे. दक्षिणेत मामूटी यांचा चाहता वर्ग मोठा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com