Rashmika Mandanna Deepfake Video
Rashmika Mandanna Deepfake Video

Rashmika Mandanna Deepfake Video: रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ बनवणारा अखेर सापडलाच! मुख्य आरोपीला झाली अटक

अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. इंटेलिजन्स फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशनचे पोलिस उपायुक्त हेमंत तिवारी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Rashmika Mandanna Deepfake Video

अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. इंटेलिजन्स फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशनचे पोलिस उपायुक्त हेमंत तिवारी यांनी याबाबत माहिती दिली आहे. काही महिन्यांपूर्वी रश्मिकाचा एक बनावट व्हिडिओ समोर आला होता, जो आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने बनवण्यात आला होता. व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी चिंता व्यक्त केली आणि कारवाईची मागणी केली होती.

या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपीचा यापूर्वीही अनेक सायबर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे. त्यानेच या अभिनेत्रीचा डीपफेक व्हिडिओ बनवला होता. त्याने एका वृद्ध महिलेलाही डिजिटल पद्धतीने ओलीस ठेवले होते.

6 नोव्हेंबरला सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये रश्मिका मंदाना लिफ्टमध्ये दिसत आहे. याबाबत रश्मिकाने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. आता पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे.

Rashmika Mandanna Deepfake Video
Shoaib Malik - Sana Javed: शोएब मलिकने तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली ती सना जावेद आहे तरी कोण?

या घटनेनंतर, दिल्ली पोलिसांनी भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 465 (forgery) आणि 469 (harming reputation) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत 66C (identity theft) आणि 66E (privacy violation) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

Rashmika Mandanna Deepfake Video
माझ्या आयुष्यातील एक झलक, शोएबने तिसऱ्यांदा बांधली लग्नगाठ अन् सानियाने शेअर केला घरातला video

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com