esakal | KBC 13: पत्नीने बिग बींना सांगितली व्यथा; वाहिनीविरोधात पतीने बजावली नोटीस
sakal

बोलून बातमी शोधा

kbc final episode telecasted Friday kargil heros in finale episode of kbc

KBC 13: पत्नीने बिग बींना सांगितली व्यथा; वाहिनीविरोधात पतीने बजावली नोटीस

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'कौन बनेगा करोडपती'चं Kaun Banega Crorepati (KBC) तेरावं सिझन सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. एका व्यक्तीने सोनी पिक्चर्स नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडविरोधात कायदेशीर नोटीस बजावली आहे. विनय खरे असं संबंधित व्यक्तीचं नाव असून त्यांनी नोटिशीचा फोटो ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. पत्नीसोबतचं घटस्फोटाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना केबीसीमध्ये माझी बदनामी केली, असा आरोप त्यांनी या नोटिशीत केला आहे. विनय खरे यांनी पत्नीलाही कायदेशीर नोटीस बजावली आहे.

विनय खरे यांच्या पत्नी श्रद्धा खरे यांनी गेल्या महिन्यात केबीसीमध्ये हजेरी लावली होती. यावेळी सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधताना श्रद्धा यांनी कौटुंबिक हिंसाचाराचा उल्लेख केला. पतीने आपल्याला कधीच पाठिंबा दिला नाही, कौटुंबिक हिंसाचारातून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचं त्यांनी बिग बींना सांगितलं. या एपिसोडमध्ये त्या फक्त दहा हजार रुपये जिंकू शकल्या होत्या. घटस्फोटाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना शोमध्ये बदनामी केल्याचा आरोप विनय खरे यांनी केला आहे. याचविरोधात त्यांनी वाहिनी आणि पत्नीविरोधात नोटीस बजावली आहे.

हेही वाचा: 'फॅमिली मॅन'मुळे समंथा-नाग चैतन्यच्या आयुष्यात घटस्फोटाचं वादळ

हेही वाचा: Bigg Boss Marathi 3: स्पर्धकांची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; पहा भन्नाट मीम्स

याविषयी विनय खरे म्हणाले, "एखाद्या व्यक्तीचं एकतर्फी मत एखादी वाहिनी कसं प्रसारित करू शकते? मी जर दहशतवादी असतो आणि माझ्याविरोधात खटला सुरू असता. तर मी जे राष्ट्राविरोधात भाष्य करेन, ते केबीसीमध्ये प्रसारित केले जाईल का", असा सवाल खरे यांनी वाहिनीला केला आहे. पत्नीने शोद्वारे बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी अद्याप वाहिनीकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

loading image
go to top