मन झालं बाजिंद: रायाच्या नव्या लूकची चर्चा | Vaibhav Chavan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vaibhav Chavan

मन झालं बाजिंद: रायाच्या नव्या लूकची चर्चा

झी मराठी वाहिनीवरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मालिका 'मन झालं बाजिंद' Man Zal Bajind प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. या मालिकेवर आणि त्यातील व्यक्तिरेखांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. कृष्णा आणि राया ही जोडीदेखील प्रेक्षकांची अगदी आवडती जोडी बनली आहे. सालस कृष्णा आणि रांगडा राया प्रेक्षकांना भावले आहेत. रायाचा रांगडा लूक सगळ्यांच्या पसंतीस पडला असून त्याच्यासारखी स्टाईल त्याचे चाहते फॉलो करत आहेत. पण आता मालिकेत रायाचा वेगळा लूक लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

राया आता शॉर्ट हेअर लूकमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या लूकमधील त्याचा हा खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मालिकेत नुकतंच राया आणि कृष्णाचं लग्न झालेलं प्रेक्षकांनी पाहिलं. आता लवकरच राया या नवीन अवतारात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

हेही वाचा: 'निंदा करनार्‍याचंबी डोळं पांढरं व्हत्याल'; मराठी अभिनेत्याची शाहरुखसाठी खास पोस्ट

या नवीन लूकबद्दल राया म्हणजेच अभिनेता वैभव चव्हाण म्हणाला, "मी या नवीन लूकसाठी खूपच जास्त उत्सुक आहे. मालिकेत खूप घडामोडी घडत आहेत. कृष्णा आणि रायाचं लग्न झालं आहे आणि आता पुढे मालिकेत अजून काही ट्विस्ट्स अँड टर्न्स येणार आहेत. त्यामुळे रायाचा हा लूक का बदलला आहे हे प्रेक्षकांना लवकरच कळेल आणि रायाच्या या नवीन लूकवरदेखील प्रेक्षक तेवढंच प्रेम करतील याची मला खात्री आहे." मन झालं बाजिंद ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

Web Title: Man Zal Bajind Fame Vaibhav Chavan Aka Raya New Look Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..