अभिनेत्री मानसी नाईकचा पार पडला साखरपुडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mansi naik

मानसीने तिच्या चाहत्यांना एक आश्चर्याचा धक्का दिला आहे. मानसीचा नुकताच साखरपुडा झाला असून तिने या सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

अभिनेत्री मानसी नाईकचा पार पडला साखरपुडा

मुंबई- अभिनेत्री मानसी नाईक तिच्या नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांमध्ये चांगलीच प्रसिद्ध आहे. सोशल मिडियावरही ती तितकीच ऍक्टीव्ह असते. टिकटॉक वरील तिच्या व्हिडिओंना तर रेकॉर्डब्रेक व्ह्युज असायचे. मानसी नाईक तिच्या नजरेने तर घायाळ करतेच मात्र तिच्या डान्सवरही चाहते फिदा आहेत. मात्र मानसीने तिच्या चाहत्यांना एक आश्चर्याचा धक्का दिला आहे. मानसीचा नुकताच साखरपुडा झाला असून तिने या सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

हे ही वाचा: रोहित शर्मासोबत फोटोतअसलेला हा मुलगा ‘तारक मेहता..’मध्ये साकारतोय भूमिका

अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक तिच्या अनेक गाण्यांमुळे प्रसिद्ध आहे. 'बघतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर' ही तिची गाणी तुफान गाजली. गेल्या कित्येक दिवसांपासून मानसीच्या रिलेशनशीपविषयी चर्चा होती. मानसी नेमकं कोणाला डेट करते? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. मात्र आता मानसीने सगळ्या प्रश्नांची उत्तर थेट फोटो शेअर करत दिली आहे. 

नुकतंच मानसी आणि प्रदीप खरेरा यांचा साखरपुडा झाला आहे. प्रदीप खरेरा हा एक बॉक्सर असून एक मॉडलदेखील आहे. गेल्या काही वर्षांपासून मानसी आणि प्रदीप एकमेकांना डेट करत होते अखेर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला असून नुकताच त्यांचा साखरपुडा पार पडला. मंगळवारी मुंबईत अत्यंत साध्या पद्धतीने या दोघांचा साखरपुडा झाला. फक्त ६ लोकांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. 

या सोहळ्यात मानसीने सुंदर साडी नेसली होती.  लाइट भगव्या आणि हिरव्या रंगाच्या साडीत ती खुप सुंदर दिसत होती. तर प्रदीपने प्रिंटे़ड शर्ट आणि पजामा कुर्ताचं ड्रेसिंग केलं होतं. मानसी व प्रदीप पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा आहे.   

manasi naik gets engaged to beau pardeep kharera  
 

loading image
go to top