esakal | रोहित शर्मासोबत फोटोत असलेला 'हा' मुलगा ‘तारक मेहता..’ मध्ये साकारतोय भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

rohit with tappu

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा हा पाचवा विजय होता. यादरम्यान सध्या सोशल मीडियावर रोहित शर्माची चर्चा सुरु असताना त्याचा एक जुना फोटोसुद्धा व्हायरल होतोय.

रोहित शर्मासोबत फोटोत असलेला 'हा' मुलगा ‘तारक मेहता..’ मध्ये साकारतोय भूमिका

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- मुंबई इंडियन्सने IPL 2020 च्या फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्माने केलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने ५ गडी राखून सहज विजय मिळवला. सामना अगदीच हातात असल्याने मुंबई इंडियन्सचा विजय जवळपास निश्चितच होता. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा हा पाचवा विजय होता. यादरम्यान सध्या सोशल मीडियावर रोहित शर्माची चर्चा सुरु असताना त्याचा एक जुना फोटोसुद्धा व्हायरल होतोय.

हे ही वाचा: श्रद्धा कपूरचा 'नागिन' लूक पाहून चाहते झाले अवाक    

रोहित शर्माच्या या व्हायरल फोटोमध्ये त्याच्यासोबत एक छोटा मुलगा दिसतोय. हा छोटा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील तिपेंद्र जेठालाल गडा ऊर्फ टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट आहे. मालिकेत लहानपणीच्या टप्पूची भूमिका भव्य गांधीने साकारली होती. त्यानंतर त्याच्या जागी राजची एण्ट्री झाली. या फोटोमध्ये राज भारताची जर्सी घालून आणि चेहऱ्यावर तिरंग्याचा रंग लावून भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा देण्यासाठी सज्ज असल्याचं दिसून येतंय. 

सध्या राजने बरंच वजन कमी केलं असून टप्पूच्या भूमिकेत चपखल बसण्यासाठी त्याने योग्य ती मेहनत घेतलीये. मार्च महिन्यात त्याने ‘तारक मेहता..’ या मालिकेसोबत तीन वर्षे पूर्ण केली आहेत. भव्य गांधी इतकंच त्याला प्रेक्षकांकडून प्रेम मिळतंय. सोशल मीडियावरही त्याच्या चाहत्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.  

taarak mehta ka ooltah chashmahs raj anadkat aka tapus unseen childhood picture  

loading image