'बॉयकॉट ट्रेन्डचं प्लॅनिंग बॉलीवूडमधील...' मंदाकिनीचा खळबळजनक खुलासा Mandakini on boycott | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mandakini Opens Up on bollywood culture  and Boycott trend

'बॉयकॉट ट्रेन्डचं प्लॅनिंग बॉलीवूडमधील...' मंदाकिनीचा खळबळजनक खुलासा

Mandakini On Boycott Trend: गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडविषयी(Bollywood) खूपच नकारात्मकता पसरली आहे. सोशल मीडियावर दर दिवशी सिनेमांवर बंदी घालणं, बॉयकॉट ट्रेन्ड याविषयीच चर्चा रंगलेली दिसत आहे. यादरम्यान आता २५ वर्षांनी इंडस्ट्रीत पुन्हा कमबॅक केलेल्या मंदाकिनीनं समोर येऊन बेधडकपणे थेट या बॉयकॉट ट्रेन्डवरनं बॉलीवूडलाच कोसलं आहे. काय म्हणालीय 'राम तेरी गंगा मैली' सिनेमाची ही अभिनेत्री? चला जाणून घेऊया

हेही वाचा: 'कुछ बातें करने का मन करता है...',बॉयकॉट ट्रेन्डवर आता अमिताभनी ओढले ताशेरे

बॉयकॉट ट्रेन्ड,कॅन्सल कल्चर अशा विविध विषयांवर आपलं थेट मत मांडताना मंदाकिनी म्हणाली आहे की,''या सगळ्या गोष्टी पाहून खूप वाईट वाटतं,दुःख होतं. पहिलं असं नव्हतं काही. दिग्दर्शक म्हणजे गुरु असे विचार असायचे. प्रत्येक कलाकार दिग्दर्शकाचा आदर करायचा. आम्ही तर त्याकाळात आमच्या दिग्दर्शकाला आदरस्थानी ठेवायचो. एक आपलेपणा असायचा त्यात,आता असं कुठेच दिसत नाही. हेच कारण आहे की आज इंडस्ट्रीतील लोक एकमेकांवरच आरोप-प्रत्यारोप करत सुटले आहेत''.

हेही वाचा: Laal Singh Chaddha वर होतोय बंगालमधील शांती भंग केल्याचा आरोप, नवं टेन्शन..

याबरोबरच मंदाकिनीनं एक दुसरा मुद्दा मांडताना म्हटलं आहे,''मला वाटतं इंडस्ट्रीतून कुणीतरी या बॉयकॉट ट्रेन्डला पाठींबा देतंय,हे सगळं बॉलीवूडमधील एका ग्रुपचं विचारपूर्वक केलेलं प्लॅनिंग आहे. कधीकधी तर मला वाटतं,जिथे लोक एकमेकांविरोधातच बोलत आहेत,तेव्हा कुणीतरी हे त्यांना फूस लावून बोलायला सांगत आहे. प्रत्येक गोष्टीत लबाडी दिसतेय. हो पण हे खोटं तुम्ही किती दिवस लपवणार''.

Web Title: Mandakini Opens Up On Bollywood Culture And Boycott

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..