गोष्ट एका ‘नटसम्राटा’ची

‘रंगमार्तंड’ हा बहुचर्चित चित्रपट ‘नटसम्राट’ चित्रपटाचा अधिकृत रिमेक
Ranga Maarthaanda
Ranga Maarthaandasakal

मंदार कुलकर्णी

‘‘मी अभिनेता आहे. मी तुमच्या मनात भावनांचं इंद्रधनुष्य तयार करू शकतो... पण मी मुखवटा काढतो, तेव्हा मी कुणीच नसतो,’’ या वाक्यानं सुरुवात होणारा ‘रंगमार्तंड’ हा बहुचर्चित चित्रपट ‘नटसम्राट’ चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. प्रकाश राज आणि रम्या कृष्णन यांचे उत्कृष्ट अभिनय असले, तरी ‘नटसम्राट’ नाटक मराठी मनांत इतकं मुरलेलं असल्यानं परिणाम करू शकत नाही.

रंगमार्तंड राघव राव (प्रकाश राज) त्यांची पत्नी राजू (रम्या कृष्णन) यांची ही कथा. निवृत्त झाल्यावर राघव राव संपत्तीची वाटणी करतात. मुलाशी आणि सुनेशी खटके उडायला लागल्यावर मुलीकडे राहायला येतात. तिथं चोरीचा आळ आल्यावर स्वाभिमानी राघव घरातून बाहेर पडतात आणि पुढे काय होतं हे सांगणारा हा चित्रपट.

कृष्णा वंशी दिग्दर्शित हा चित्रपट एका नटसम्राटाच्या आयुष्याची वाताहत मांडतो. हा चित्रपट खिळवून ठेवतो ते खरं तर प्रकाश राज आणि रम्या यांच्या अभिनयाने. विशेष म्हणजे अनेक विनोदी भूमिकांमुळे ओळखले जाणारे ब्रह्मनादम इथं राघव राव यांच्या मित्राच्या भूमिकेत खऱ्या अर्थानं रंग भरतात.

मूळ चित्रपटातील लिनिअर मांडणी थोडी बदलून वंशी यांनी तिच्यात नाट्यमयता आणण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीला तेलगू चित्रपटांमधील सगळ्या अभिनेत्यांना केलेला सलाम आणि ते शब्द हेही चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. मात्र, ‘नटसम्राट’ या चित्रपटाचं वैशिष्ट्य होतं त्यातले शब्द.

‘कुणी घर देता का घर’ आणि ‘हे स्वर्गस्थ शक्तींनो’ अशी मूळ नाटकातली स्वगतं चित्रपटात आणणं हे आव्हान होतं आणि चित्रपटाशी संबंधित बहुतांश जण रंगभूमीशीच कनेक्टेड असल्यामुळे ते आव्हान ते पचवू शकले. ‘रंगमार्तंड’ चित्रपटात ते ‘ऑर्गॅनिक’ पद्धतीनं आल्याचं वाटत नाही.

‘नटसम्राट’ चित्रपटात हे संवाद आले ते रंगभूमीची सगळी परंपरा, वैभव घेऊन. अर्थात काही टप्प्यांवर ‘रंगमार्तंड’ नक्की बाजी मारतो. प्रकाश राज आणि रम्या यांच्यातले आणि प्रकाश राज आणि ब्रह्मनादम यांच्यातले प्रसंग येतात, तेव्हा हे दिग्गज कलाकार त्यात कसे रंग भरतात हे बघणं सुखावणारं आहे. इलयाराजा यांचं संगीत मात्र फार प्रभाव पाडत नाही. हा चित्रपट नुकताच ‘ॲमेझॉन प्राइम’वर प्रदर्शित झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com