Manjiri Prasad Oak: प्रिय प्रसाद! तू म्हणशील तसं.. मंजिरीनं नवऱ्यासाठी लिहिली खास पोस्ट.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manjiri oak shared post for husband Prasad Oak on wedding anniversary

Manjiri Prasad Oak: प्रिय प्रसाद! तू म्हणशील तसं.. मंजिरीनं नवऱ्यासाठी लिहिली खास पोस्ट..

Manjiri Prasad Oak: अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक सध्या भलताच चर्चेत आहेत. 'चंद्रमुखी' आणि 'धर्मवीर' असे दोन सिनेमे त्याने लागोपाठ दिले. एका चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले तर एका चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका बजावली. त्याचा 'धर्मवीर'चा सर्व प्रवास आता 'माझा आनंद' या पुस्तकातूनही समोर आला आहे. लवकरच तो ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर चित्रपट करणार आहे. त्याच्या या प्रवासात त्याला भक्कम साथ दिली ती त्याच्या बायकोने म्हणजेच मंजिरी ओकने.. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस त्यानिमित्ताने मंजिरीने प्रसाद साठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

(Manjiri oak shared post for husband Prasad Oak on wedding anniversary)

हेही वाचा: Bipasha Basu: बंगालच्या या ब्लॅक ब्युटीने गोऱ्याचिट्ट्या अभिनेत्रींचं मार्केट केलं होतं डाउन..

प्रसाद अत्यंत मेहनतीने पुढे आला आहे. एकेकाळी त्याला राहायला घर नव्हते, अगदी रोजचा चरितार्थ भागवणेही कठीण होते. तो पुण्याहून मुंबईत आल्याने इथे त्याचे काहीच नव्हते, सोबत होती ती फक्त मंजिरी ओक म्हणजे त्याची बायको. मंजिरीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि संसारात भक्कम साथ दिली. तिच्या सोबतीमुळेच प्रसाद पुढे जाऊ शकला. याविषयी तो अनेकदा बोलला आहे. पण आज मंजिरी प्रसाद विषयी लिहिती झाली आहे.

हेही वाचा: Prajakta Mali: उद्घाटनाला राज.. ब्रँडच्या नावातही राज.. काय आहे प्राजक्ता माळीचं 'राज' कनेक्शन?

मंजिरीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वर एक पोस्ट लिहिली आहे, ती म्हणते, 'प्रिय प्रसाद .. ९३ साली आपली खऱ्या अर्थानी “प्रेमाची गोष्ट “ सुरू झाली . अर्थात त्याआधी तू मला बराच काळ “अधांतर” ठेवलं होतंस. आणि त्यामुळे आपल्यामधे काही दिवस “रणांगण” तापलं होतं...पण हळू हळू "अशी बायको हवी" म्हणत तू “एकदा पहाव करून “ असंही म्हणालास आणि आपण लग्न करु का नाही अस वाटणाऱ्या लोकांचा “भ्रमाचा भोपळा” फोडलास आणि शेवटी ही "साहेबजी डार्लिंग" झालीच. आणि "धन धना धन” असा आपला संसार सुरू झाला . तो चालू असताना तुला अनेकदा मला मनवताना “बोल बेबी बोल” म्हणावं लागलं आणि मला पटवावं लागलं की खरंच “मी बबन प्रामाणिक “ आहे.'

पुढे ती म्हणाली आहे, पण तुला लवकरच कळलं की मीच या घराची “ सूत्रधार द बॉस “ आहे अर्थात्त तुला ती संधी मी “ आलटून पालटून “ देत होते . ह्यालाच म्हणत असतील का सुखी संसाराची “नांदी"??? आपला पुण्याचा “वाडा चिरेबंदी “ सोडून आज २५ वर्ष झाली . पण तुझ्या बरोबर च्या अनेक सुख दुःखाची ही “ बेचकी” तोडून आज ही मी तुझ्या बरोबर एका “मग्न तळ्याकाठी ” च बसलीय असंच वाटतं . त्यामुळे पुढची २५ वर्ष एकमेकांना “तू म्हणशील तसं" म्हणतच राहुयात.'' असं ती म्हणाली आहे.

या पोस्ट मध्ये तिने प्रसादच्या सर्व चित्रपटांची नावे गुंफली आहे. आणि त्यावर तिने दोघांच्या संसाराची गोष्ट सांगितली आहे. तिची ही पोस्ट सध्या बरीच चर्चेत आली आहे. चाहत्यांसह अनेक कलाकारांनी त्या दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

टॅग्स :prasad oak