esakal | 'लाली' दोन वर्षांपासून बेकार, 'फुकरे' फेम अभिनेत्याची खंत
sakal

बोलून बातमी शोधा

manjot singh

'लाली' दोन वर्षांपासून बेकार, 'फुकरे' फेम अभिनेत्याची खंत

sakal_logo
By
युगंधर ताजणे

कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. आर्थिक चणचण ही त्यापैकी प्रमुख समस्या आहे. मागील काही दिवसांत कित्येक सेलिब्रेटींनी आपल्याला आर्थिक समस्या भेडसावत असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या होत्या. त्यात काही ज्येष्ठ कलाकारही आहेत. ज्यांनी टेलिव्हिजन (television) आणि चित्रपट (movies) या क्षेत्रात अनेक दशकं काम केलं आहे. अशातच आणखी एका तरुण अभिनेत्यानं सोशल मीडियावर आपल्याला काम मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. आपण दोन वर्षांपासून घरात असल्याचे त्यानं सांगितले आहे. (manjot singh recalls being jobless sitting home for two years after fukrey yst88)

फुकरे (fukrey) फेम मनजोत सिंग सध्या चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे त्याला गेल्या दोन वर्षांपासून कुठेच काम मिळत नाहीये. त्यामुळे तो आर्थिक संकटात आहे. त्यानं अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांच्या कार्यालयाचे उंबरे झिजवले आहेत. मात्र त्याच्या पदरी निराशा पडल्याचेही समोर आले आहे. फुकरे मध्ये मनजोतनं लालीची भूमिका केली होती. जी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. फुकरे प्रदर्शित झाल्यानंतर त्याला कुठेही काम मिळालं नाही. असं तो सांगतो. फुकरेनंतर त्याला ज्याप्रकारच्या भूमिका ऑफर करण्यात आल्या. त्या करण्यास आपण तयार नसल्याचेही मनजीतनं सांगितलं.

सुदैवानं तो लवकरच एका वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. त्या मालिकेचे नाव चुत्पाज असे आहे. त्याविषयी मनजोतनं सांगितलं, जेव्हा मी माझे करिअर सुरु केले होते. तेव्हा मी 16 वर्षांचा होतो. त्यावेळी मला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या होत्या. मात्र फुकरेनंतर दोन वर्षे झाली माझ्याकडे काहीच काम नाही.

हेही वाचा: City Of Dreams 2 Trailer; बाप जिंकणार की मुलगी?

मनजोत म्हणतो, अशा प्रकारच्या भूमिकांसाठी मला विचारणा झाली होती, ज्या भूमिका करायच्या नाहीत असं मी ठरवले होते. त्यामुळे मी काम करुन समाधानी राहिलो नसतो. तेव्हा त्या भूमिका मी काही केल्या नाहीत. माझा तो काळ खूप कठीण होता. एकेकाळी घरात बसलो होतो. अभ्यास सुरु होता. तेव्हा काही चित्रपटांच्या ऑफर होत्या. पैसे मिळत होते. आयुष्य एकदम रंगीत वाटायला लागलं होतं. मात्र वास्तविक परिस्थिती काय आहे हे आता समजते आहे. मी अजून माझ्या चांगल्या वेळेच्या प्रतिक्षेत असल्याचेही त्यानं सांगितलं.

loading image