esakal | The Family Man 2 ची प्रतिक्षा संपली, तारीख जाहीर

बोलून बातमी शोधा

manoj bajpai web series the family man 2
The Family Man 2 ची प्रतिक्षा संपली, तारीख जाहीर
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - प्रेक्षकांना द फॅमिली मॅन (The Family Man 2) च्या दुस-या भागाची प्रतिक्षा गेल्या अनेक दिवसांपासून होती. ती आता संपली आहे. वास्तविक आतारपर्यत तीन ते चारवेळा निर्मात्यांनी या मालिकेची तारीख जाहीर केली होती. मात्र कोरोना आणि तांडव नावाच्या वेबलसीरिजमुळे या मालिकेचा मुहूर्त चूकत होता. अखेर द फॅमिली मॅन (The Family Man 2) ची रिलिज डेट समोर आली आहे. त्यामुळे प्रेक्षक ज्या मालिकेच्या दुस-या भागाची आतुरतेनं वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. या मालिकेचा पहिला सीझन 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

द फॅमिली मॅन (The Family Man 2) मध्ये मुख्य भूमिका करणारा अभिनेता मनोज वाजपेयीनं यापूर्वी व्टिट करुन या मालिकेच्या प्रदर्शनाविषयी येणा-या अडचणींची माहिती दिली होती. त्यावेळी त्यालाही प्रेक्षकांनी ही मालिका लवकरात लवकर प्रदर्शित करावी अशी विनंती केली होती. पिंकविलाच्या एका रिपोर्टनुसार द फॅमिली मॅन (The Family Man 2) च्या निर्मात्यांनी २ जुनला ही मालिका प्रदर्शित करणार असल्याचे सांगितले आहे. रिपोर्टच्या म्हणण्यानुसार, द फॅमिली मॅन (The Family Man 2) आपल्या फायनल ड्राफ्टच्या बरोबर अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा: ते दिवस पुन्हा कधी येणार? विराजसने शेअर केला कथित गर्लफ्रेंडसोबतचा फोटो

हेही वाचा: त्याला पाहताच कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला... 

या मालिकेचे दिग्दर्शक राज एंड डीके लवकरच अधिकृतपणे मालिकेच्या प्रदर्शनाविषयी सांगितले आहे. वास्तविक द फॅमिली मॅन (The Family Man 2) चे चित्रिकरण हे काही महिन्यांपूर्वीच पार पडले होते. आता या मालिकेची सर्व टीम एडिटिंगमध्ये व्यस्त आहे. अशावेळी ही मालिका २ जुन रोजी प्रदर्शित होण्यास तयार आहे. तांडव मालिकेमुळे द फॅमिली मॅन (The Family Man 2) मालिका वादाच्या भोव-यात सापडली होती. त्यावेळीच ही मालिका प्रदर्शित होणार होती.