esakal | ते दिवस पुन्हा कधी येणार? विराजसने शेअर केला कथित गर्लफ्रेंडसोबतचा फोटो

बोलून बातमी शोधा

Virajas Kulkarni
ते दिवस पुन्हा कधी येणार? विराजसने शेअर केला कथित गर्लफ्रेंडसोबतचा फोटो
sakal_logo
By
स्वाती वेमूल

सध्याची कोरोनाची परिस्थिती आणि वाढती रुग्णसंख्या पाहता लोकांच्या मोकळेपणाने वावरण्यावर, फिरण्यावर, एकत्र भेटण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. पूर्वीसारखं मित्रमैत्रिणींना भेटणं, प्रेयसीला सरप्राइज देणं या सर्व गोष्टी अनेकजणांना आठवत असतील. अशीच आठवण अभिनेता विराजस कुलकर्णीलाही Virajas Kulkarni येत आहे. 'माझा होशील ना' Majha Hoshil Na या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता विराजस याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो त्याच्या कथित गर्लफ्रेंडसोबतचा आहे. (Virajas Kulkarni shares a throwback picture with rumored girlfriend Shivani Rangole)

विराजस आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे Shivani Rangole एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. शिवानीसोबत 'क्वालिटी टाइम' घालवतानाचा फोटो पोस्ट करत विराजसने लिहिलं, 'जेव्हा लोक सुरक्षितरित्या एकमेकांना भेटू शकत होते, वेळ घालवू शकत होते.' विराजस आणि शिवानी एकमेकांचे चांगले मित्रसुद्धा आहेत. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या लग्नात या दोघांनी एकत्र हजेरी लावली होती आणि एकाच रंगसंगतीचे कपडे परिधान केले होते. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा : उर्मिलाला पाहताच क्षणी प्रेमात पडला आदिनाथ अन्..

विराजससोबतच्या अफेअरच्या चर्चांवर शिवानी 'ई टाइम्स टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती, "होय, आमच्यात खूप चांगली मैत्री आहे आणि आम्हाला एकमेकांचा सहवास खूप आवडतो. पण लोकांनी माझ्या आणि विराजच्या नात्याबद्दल बोलत राहावं, चर्चा करत राहावी आणि मनमोकळेपणाने अंदाज वर्तवले जावेत असं मला वाटतं. कारण त्यात एक वेगळीच मजा आहे."