माझ्या वाट्याला गेला थेट कार्यक्रम केला! भिकु म्हात्रेनं नाठाळ केआरकेला शिकवला धडा |Manoj Bajpayee | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manoj Bajpayee

Manoj Bajpayee : माझ्या वाट्याला गेला थेट कार्यक्रम केला! भिकु म्हात्रेनं नाठाळ केआरकेला शिकवला धडा

Defamation Case : बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं मोठ्या झालेल्या कलावंतांमध्ये मनोज वाजपेयीचे नाव आदरानं घ्यावं लागतं. मोठा संघर्ष करत त्यानं स्वताच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता त्याच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मनोज सहसा कुणाच्या वाटेला जात नाही आणि गेला तर सोडत नाही हे आता पुन्हा एकदा दिसून आले आहे.

सोशल मीडियावर द फॅमिली मॅन फेम मनोज वाजपेयी आणि आपल्या वाचाळपणाबद्दल प्रसिद्ध असणारा केआरके यांच्यातील वाद समोर आला आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यात मोठा वाद सुरु होता. ती लढाई कोर्टामध्ये सुरु होती. अखेर त्यावर कोर्टानं केआरकेला चांगलेच सुनावले आहे. त्याचे झाले असे की, केआरकेनं मनोज वाजपेयीला चरसी म्हणून संबोधले होते. या शब्दांत त्याच्यावर निशाणा साधला होता. वास्तविक केआरके हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या वादांमुळे चर्चेत असणारा सेलिब्रेटी आहे.

केआरकेनं यापूर्वी अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींशी पंगा घेतला आहे. त्यामध्ये बॉलीवूडचा भाईजान सलमान खान, जॉन अब्राहम, कंगना रनौत, स्वरा भास्कर, अनुराग कश्यप यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. त्यानं मनोज वाजपेयीला देखील सोडले नाही. अर्वाच्च शब्दांत त्याच्यावर त्यानं तोफ डागली होती. त्यानंतर मनोजनं थेट कोर्टात धाव घेतली होती. यावर आता कोर्टानं केआरके अर्थात कमाल राशिद खानला दणका दिला आहे.

Manoj Bajpayee

Manoj Bajpayee

मनोजनं केआरकेच्या विरोधात मध्यप्रदेशातील इंदोरमधील जिल्हा न्यायालयात तक्रार केली होती. त्याच्याविरोधात मानहानी केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी वाजपेयीनं आपल्या अर्जात केली होती. यावर केआरकेनं तो खटला रद्द करावा असा अर्ज कोर्टाकडे केला होता. कोर्टानं मात्र केआरकेला दिलासा दिलेला नाही. २६ जुलै २०२१ रोजी केआरकेनं मनोज वाजपेयीला चरसी असे संबोधले होते.