Manoj Bajpayee: बिहारमध्ये बनणार फिल्मसिटी? मनोज बाजपेयी म्हणाले, 'गेली 15-20 वर्षांपासून'

बॉलीवूड अभिनेता मनोज बाजपेयी यांनी सांगितलं आहे की, मी 15-20 वर्षांपासून बिहारमध्ये फिल्म सिटी बनवण्याची सरकारकडे मागणी करत आहे.
manoj bajpayee
manoj bajpayeesakal

Manoj Bajpayee on Film City in Bihar: मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय नावं म्हणजे मनोज बाजपेयी. बॉलीवूडमध्ये आपल्या शानदार अभिनयासाठी ओळखले जाणारे मनोज बाजपेयी यांनी शूल, सत्या, गँग्स ऑफ वासेपूर, स्पेशल 26 सारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकरल्या आहेत . यासोबतच त्याने 'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजमध्ये उत्तम काम केले आहे.

manoj bajpayee
Shiv Thakare: 'दम हाय नावात वट हाय गावात'! शिव गावाला आला गावकऱ्यांना आनंद झाला..

'द फॅमिली मॅन' मुळे मनोज वाजपेयीनं पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केलयं. बिहारच्या चंपारण जिल्ह्यातील एका छोट्या गावातून आलेल्या मनोज बाजपेयीने मायानगरीत मोठे स्थान मिळवले आहे. तो नुकताच पाटणा येथे एका कार्यक्रमात पोहोचला होता. या त्याला राज्यात होणाऱ्या फिल्मसिटीबद्दल विचारण्यात आलं.

त्यावेळी त्याने सांगितले की, एक कलाकार म्हणून मी 15-20 वर्षांपासून सरकारकडे राज्यात फिल्मसिटी बनवण्याची मागणी करत आहे. यासोबतच राज्यात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचीही स्थापना व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे.

manoj bajpayee
Vivek Agnihotri On Pathaan: 'बॉयकॉट गँगमुळेच पठाण यशस्वी', विवेक अग्नीहोत्रीनं शाहरुखचं कौतुक केलं की...

मनोज बाजपेयी म्हणाले की, बिहारमध्ये फिल्मसिटी बनवण्याबाबत आम्ही 15-20 वर्षांपासून सरकारला निवेदन देत आहोत. अद्याप याबाबत काहीही झाले नाही. ते म्हणाले की, सरकारला विनंती करणे हेच केवळ कलाकारांच्याच हातात आहे. बाकीचे काम सरकारच्या हातात आहे.

काही दिवसांपूर्वी तेजस्वी यादव यांची भेट घेतल्याचही त्यांने सांगितले. या भेटीतही त्यांने राज्यातील कला आणि संस्कृतीच्या विकासाबाबत चर्चा केली. त्यांने सांगितले की, राज्य सरकारने बिहारमध्ये फिल्म सिटी सुरू करण्याची मागणी केली आहे. यासोबतच राज्यात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) देखील उघडण्यात येणार यावे याबद्दलही चर्चा झाली आहे.

manoj bajpayee
Ashutosh Gowariker Birthday: बॉलीवूडच्या दिग्दर्शकांना जशास तसं उत्तर देणारा 'मराठमोळा दिग्दर्शक'!

मनोज बाजपेयी यांच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर त्यांचा 'गुलमोहर' हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. हा एक फॅमिली ड्रामा आहे. तो चित्रपट ३ मार्च रोजी OTT प्लॅटफॉर्म Disney + Hotstar वर प्रदर्शित होत आहे. गुलमोहरमध्ये त्याच्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, सिमरन आणि सूरज शर्मा आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com