Ashutosh Gowariker Birthday: बॉलीवूडच्या दिग्दर्शकांना जशास तसं उत्तर देणारा 'मराठमोळा दिग्दर्शक'! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashutosh Gowariker Birthday

Ashutosh Gowariker Birthday: बॉलीवूडच्या दिग्दर्शकांना जशास तसं उत्तर देणारा 'मराठमोळा दिग्दर्शक'!

Ashutosh Gowariker Birthday: आशुतोष गोवारीकर हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आहेत. ते विशेषतः त्याच्या पीरियड ड्रामा चित्रपटांसाठी ओळखले जातात. आशुतोष यांनी त्याच्या चित्रपटांसाठी महागडे सेट बनवल्याचीही चर्चा आहे, जेणेकरून ते जुना काळ शक्य तितक्या जवळून दाखवू शकतील.आशुतोष यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1964 रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे झाला. त्याची आज केवळ भारताच नव्हे तर पुर्ण जगात नावं आहे.

त्याच्या टॉप हिट चित्रपटांवर एक नजर टाकूया जी तुम्ही OTT वर पहू शकता आणि ही चित्रपट आजही अजरामर आहेत हे म्हणनं वावगं ठरणार नाही.

स्वदेश:

स्वदेश:

स्वदेश:

गोवारीकर यांचा 'स्वदेश' हा चित्रपट 2004 मध्ये रिलिज करण्यात आला होता. या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन गोवारीकर यांनी केले आहे. या चित्रपटात नासामध्ये काम करणाऱ्या एका वैज्ञानिकाची गोष्ट सांगितली आहे जो त्याच्या गावात येऊन वीज करतो. हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्याची मागणीही त्यावेळी करण्यात आली होती. चित्रपटाला IMDb वर 8.2 रेटिंग मिळाले आहे. देशभक्तीने सजलेला हा सर्वोत्तम चित्रपट नेटफ्लिक्सवर तुम्हाला पाहता येईल.

लगान:

लगान:

लगान:

आमिर खान आणि ग्रेसी सिंग यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 15 जून 2001 रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत सामील झाला होता. यावेळी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान गोवारीकर यांना स्लिप्ड डिस्कचा त्रास झाला आणि अनेक दिवस त्यांनी बेडवर पडून चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाला IMDb वर 8.1 रेटिंग आहे. हा सर्वोत्तम पीरियड ड्रामा नेटफ्लिक्सवर पाहता येईल

जोधा अकबर:

जोधा अकबर:

जोधा अकबर:

आशुतोष गोवारीकर यांचा 'जोधा-अकबर' हा एक पीरियड ड्रामा चित्रपट होता, ज्यात मुघल सम्राट अकबर आणि हिंदू राजकुमारी जोधा यांच्या प्रेमकथेचे चित्रण होते. 2008 मध्ये आलेल्या या चित्रपटात हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रमुख भुमिका होत्या. 1500 इसवी सनाचा भारत पडद्यावर चांगला दाखवता यावा म्हणून गोवारीकर यांनी चित्रपटाच्या सेटवर बराच खर्च केला होता. या चित्रपटाचे IMDb रेटिंग 7.5 आहे. तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवरही पाहू शकता.

मोहनजोदड़ो:

मोहनजोदड़ो:

मोहनजोदड़ो:

2016 च्या या पीरियड ड्रामा चित्रपटात हृतिक रोशन आणि पूजा हेगडे यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाची कथा 2016 इ.स. पूर्व मोहेंजोदारोच्या प्रेमकथेवर आधारित होतो.या चित्रपटासाठी भव्य सेट उभारण्यात आला होता. तथापि, गोवारीकरच्या इतर चित्रपटांप्रमाणे या चित्रपटाने कमाई केली नाही किंवा समीक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. चित्रपटाला IMDb वर 5.6 रेटिंग आहे. हा चित्रपट Disney + Hotstar वर पाहता येईल.

पानीपत

पानीपत

पानीपत

ऐतिहासिक चित्रपटांमध्ये आशुतोष गोवारीकर यांच्या पानीपत या चित्रपटाचाही उल्लेख करावाचं लागेल. या चित्रपटाला तितके यश मिळाले नसले तरी या चित्रपटाला समिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. तुम्ही हा चित्रपट अजून पाहिला नसेल, तर तुम्ही तो नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करू शकता.