esakal | 'बहुत बुरा लगता है'; मनोज वाजपेयीने सांगितला पत्रकारांसोबतचा अनुभव
sakal

बोलून बातमी शोधा

'बहुत बुरा लगता है'; मनोज वाजपेयीने सांगितला पत्रकारांसोबतचा अनुभव

'बहुत बुरा लगता है'; मनोज वाजपेयीने सांगितला पत्रकारांसोबतचा अनुभव

sakal_logo
By
शरयू काकडे

सध्या वेबसीरिजच्या दुनियेत 'द फॅमिली मॅन २' (The family man 2) ची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच 'द फॅमिली मॅन २' सिरीजमध्ये प्रमुख भूमिका निभावणारा अभिनेता मनोज वायपेयीच्या अभिनयाचे देखील कौतुक केले जात आहे. सध्या सगळीकडे चर्चेत असलेला मनोजने एका कार्यक्रमात पत्रकारसोबत घडलेला एक किस्सा सांगितला आहे. आज यशाच्या शिखरावर असताना त्याला सगळे विचारत आहे पण, असा एका काळ होता जेव्हा त्याला एका पत्रकाराने दुर्लक्षित केले होते. काही वर्षांपूर्वी जेव्हा त्याच्या बॉलीवूडमधील करिअरचा सर्वात कठीण काळ सुरु असताना हा प्रकार घडला होता. (Manoj Bajpayee recalls being snubbed by journalist during rough patch in his career Bura lagta hai)

मनोज वाजपेयीच्या अभिनयाचे कित्येक जण चाहाते आहेत. गँगस् ऑफ वासेपूर, आयारी, स्पेशल 26, सत्या, तेवर, अक्स या चित्रपटातील त्याच्या भूमिका गाजल्या आहेत. गँगस् ऑफ वासेपूर, 'द फॅमिली मॅन प्रदर्शित झाल्यापासून अभिनेता मनोज वाजपेयी त्याचा चाहाता वर्ग वाढत आहे. त्यामुळे सध्या सोशल मिडिया, न्युज सगळीकडे त्याचीच चर्चा सूरू आहे. पण, यशाच्या शिखरावर असलेल्या अभिनेता मनोज वाजपेयी आपले अपयश मात्र विसलेला नाही.

हेही वाचा: मनोज वाजपेयीची ऑनस्क्रीन मुलगी; जाहिराती, मालिकांमध्येही केलंय काम

हेही वाचा: The Family Man 2: अशी असेल तिसऱ्या सिझनची कथा; दिग्दर्शकांचा खुलासा

एका कार्यक्रमात रेडिओ होस्ट सिध्दार्थ कानन यांच्याशी बोलताना मनोजने अपयशाच्या काळातील एक किस्सा सांगितला. ''काही वर्षांपूर्वी मी एका कार्यक्रमात गेला होता जिथे पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमात आलेल्या पाहूण्यासोबत संवाद साधत ते व्हिडिओ शुट करत होते. त्यावेळी जेव्हा एका पत्रकाराने मला दुर्लक्षित केले तेव्हा मला फार वाईट वाटले. त्यानंतर, तेव्हा पत्रकारासाठी मी न्युज कंटेट होऊ शकत नाही, हे मला लगेच समलजले होते आणि मी ते मान्यही केले.'' ''एखादा यशाला जस कवटळातो त्याप्रमाणेच अपयशाला देखील कवटळाले पाहिजे'' असेही तो पुढे म्हणाला.

याबाबत बोलताना तो म्हणाला, ''माझ्या करीअरचा सर्वात कठीण काळ सुरू होता. 'सारे जर्नलिस्ट भी गायब हो गये थे, ऑफर तो गायब हो ही गये थे''(तेव्हा सगळ्या ऑफर आधीच गेल्या होत्या, पत्रकार देखील दुर्लक्ष्य करत होते.) हा किस्सा सांगताना भावूक झालेला मनोज इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीला म्हणाला, 'किसी और के साथ ऐसा मत करना भैया, बहोत बुरा लगता है ''(दुसऱ्या कोणासोबत असे कधीच वागू नका, खूप वाईट वाटते.)