esakal | The Family Man 2: अशी असेल तिसऱ्या सिझनची कथा; दिग्दर्शकांचा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

manoj bajpayee

The Family Man 2: अशी असेल तिसऱ्या सिझनची कथा; दिग्दर्शकांचा खुलासा

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'द फॅमिली मॅन'च्या The Family Man 2 पहिल्या सिझनप्रमाणेच दुसरा सिझनसुद्धा उत्सुकता ताणून ठेवणाऱ्या वळणापाशी येऊन संपतो. लोणावळ्यात नेमकं काय झालं होतं हे सुची (प्रियामणी) Priyamani श्रीकांतला (मनोज वाजपेयी) Manoj Bajpayee सांगणार का, तिसऱ्या सिझनची कथा कोव्हिड १९ भोवती फिरणार का, आता TASK चं पुढील मिशन ईशान्येकडे वळणार का, या सर्वांची उत्तरं या वेब सीरिजच्या निर्मात्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिली आहेत. या मुलाखतीत निर्माते, दिग्दर्शक राज निदिमोरु आणि कृष्णा डीके यांनी तिसऱ्या सिझनविषयी व्यक्त झाले आहेत. (The Family Man 2 makers explain that cliff hanger ending and upcoming season story)

तिसऱ्या सिझनची कथा अजून लिहायची असून त्यात नेमकं काय घडणार हे आधीच डोक्यात ठरलेलं आहे, असं राज म्हणाले. दुसऱ्या सिझनची कथा लिहित असतानाच तिसऱ्याविषयीचा विचार सुरू झाला होता, असं त्यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. "कथा आधीच डोक्यात होती. सिझन २ बद्दल चर्चा करत असतानाच आमच्या समोर पुढील कथा तयार होती", असं ते म्हणाले.

हेही वाचा: 'द फॅमिली मॅन २'मधील प्रियामणीचं विद्या बालन कनेक्शन माहितीये का?

'द फॅमिली मॅन २'च्या कथेचा शेवट हा कोरोना महामारी आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला. हा शेवटचा सीन पूर्णपणे वेगळा शूट करण्यात आला होता, कारण त्यांना पुढील सिझनमध्ये कोरोनाविषयी भाष्य करायचं होतं. "शेवटचं दृश्य वेगळं शूट केलं गेलं. कारण कथा पुढे कोणतं वळण घेणार आणि कोणतं नाही. त्याची झलक त्या दृश्यात दाखवायची होती. पुढे नेमकं काय होणार याची उत्सुकताही ताणून ठेवायची होती. तिसऱ्या सिझनमध्ये कोरोना महामारीवर आधारित कथानक नक्कीच असेल, पण ते किती प्रमाणात दाखवता येणार हे मी आता नाही सांगू शकत", असं राज यांनी सांगितलं.

पुढील सिझनमध्येही श्रीकांतचा प्रवास काही सोपा राहणार नाही, कारण कुटुंब आणि काम यांमध्ये त्याची ससेहोलपट होत राहणार, असं लेखक सुपर्ण वर्मा यांनी स्पष्ट केलं. "श्रीकांत आणि सुची यांच्या किचनमधील दृश्याला आम्ही एक वेगळं वळण दिलंय, त्यामुळे पुढील कथानकात एक मोठा बॉम्ब फुटण्याची शक्यता आहे", अशीही कल्पना त्यांनी दिली.

हेही वाचा: The Family Man 2: मनोज वाजपेयीचं तगडं मानधन; जाणून घ्या इतर कलाकारांचीही फी