Manoj Muntashir On Pathaan: चूक दुरुस्त करण्याऐवजी ते.. लेखक मनोज मुंतशीरची 'पठाण'वर टीका..

शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावरून सुरू असलेल्या वादात आता मनोज मुंतशीरने उडी घेतली आहे.
Manoj Muntashir reacts on besharam rang song in Pathaan movie
Manoj Muntashir reacts on besharam rang song in Pathaan moviesakal

pathan movie trolled: किंग खान शाहरुख खान आणि त्याचा 'पठाण' हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यात दीपिकाने भगवी बिकिनी घातल्याने हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. या चित्रपटावर बहिष्काराची मागणी होत आहे. अनेक राजकीय नेते, विचारवंत यावर आपले मत देत असतानाच एका मुलाखती दरम्यान लेखक मनोज मुंतशीर याने पठाण चित्रपटावर टीका केली आहे.

(Manoj Muntashir reacts on besharam rang song in Pathaan movie)

Manoj Muntashir reacts on besharam rang song in Pathaan movie
Shah Rukh Khan Pathaan: तो फक्त चित्रपटासाठी मंदिरात गेला नाही.. तर हिंदूंचे हे सणही करतो साजरा..

हिंदुत्ववाडी संघटना आणि राजकीय विश्वातून या गाण्यावर टीका होत असली तरी मनोरंजन विश्वातून 'पठाण'ला पाठिंबा मिळत आहे. पण लेखक मनोज मुंतशीर याने मात्र 'पठाण'वर टीका केली आहे.

एका मुलाखतीत तो म्हणाला, 'एवढा विरोध होऊनही या गाण्यात काहीच बदल करण्यात आलेले नाहीत. जर लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर निर्मात्यांकडून नक्कीच काहीतरी चूक झालेली आहे. चूक दुरुस्त करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. दिग्दर्शक, संगीतकार तसेच शाहरुख खान यांना जर चूक सापडली असती तर त्यात नक्कीच त्यांनी बदल केले असते.' असा उपरोधीक टोला ही त्याने लगावला.

'पठाणच्या निमित्ताने शाहरुख जवळपास 4 वर्षांनी मोठ्या पडद्यावर येत आहे. त्याच्या या चित्रपटाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता होती,पण या चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यातील भागव्या बिकिनीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या चित्रपटात शाहरुखसह दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम यांची यात महत्त्वाची भूमिका आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com