पाठकबाईंना दागिन्यांची आवड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत राणादाची ‘पाठकबाई’ ही लाडकी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. सुंदर आणि सालस अशा पाठकबाईंना खऱ्या आयुष्यातही दागिन्यांची खूप आवड आहे.

छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत राणादाची ‘पाठकबाई’ ही लाडकी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. सुंदर आणि सालस अशा पाठकबाईंना खऱ्या आयुष्यातही दागिन्यांची खूप आवड आहे.

नुकताच अक्षया देवधर हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक सुंदर नोझपिन घालून फोटो पोस्ट केला होता आणि त्यावर तिने कॅप्शनमध्ये असेही लिहिले होते ‘लव्ह फॉर नोझपिन’. अर्थातच त्या छोट्याशा दागिन्यामुळे अक्षयाचे सौंदर्य खुलून दिसत होते. अक्षया तिच्या सोशल मीडियावरून नेहमीच छान-छान दागिने आणि पारंपरिक तसेच मॉडर्न पोशाखातील सुंदर-सुंदर फोटोज चाहत्यांसाठी पोस्ट करत असते. ‘तुझ्यात जीव रंगला’मधील पाठकबाईंचे अर्थात अक्षयाचे राहणीमान जरी साधे असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र तिला नटायला खूप आवडते, हे मात्र नक्की.

Web Title: manoranjan news actress akshaya deodhar jewellery