Veer Murarbaji: हा अभिनेता साकारणार रणझूंजार मुरारबाजींची भूमिका, पहिली झलक आली समोर

रणधुरंधर नरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा रुपेरी पडदयावर येणार आहे.
veer murarbaji, ankit mohan,
veer murarbaji, ankit mohan, SAKAL

छत्रपती शिवरायांचे चरित्र आणि मराठ्यांच्या इतिहास समोर ठेवून अनेक सिनेमे केले जात आहेत. काहीच महिन्यांपूर्वी पावनखिंड , शेर शिवराज, सरसेनापती हंबीरराव हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुराळा करून गेले. आता रणधुरंधर नरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा रुपेरी पडदयावर येणार आहे. 'वीर मुरारबाजी' असं या सिनेमाचं नाव असून सिनेमाचं पहिलं पोस्टर समोर आलंय.

veer murarbaji, ankit mohan,
Shah Rukh Khan Pathaan: 'पठाण'साठी सांगलीच्या पठ्ठ्यानं अख्खं थिएटरच केलं बुक.. शाहरुखही म्हणाला..

सिनेमाच्या टीमने 'वीर मुरारबाजी' युध्दपटाचे पोस्टर छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण केले आहे. या सिनेमातून पुरंदरचा रणसंग्राम मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. सिनेमात रणधुरंधर नरवीर मुरारबाजी देशपांडे यांची भूमिका कोण साकारणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर याचा उलगडा झालाय. अभिनेता अंकित मोहन सिनेमात मुरारबाजी देशपांडे यांची भूमिका साकारणार आहे.

अठरापगड जाती-जमातीच्या शूर मावळ्यांना सोबत घेत शिवरायांनी जाज्वल्य इतिहास घडविला. सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात लढाया करणारे शूरवीर आणि पराक्रमी मावळे स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावण्यासाठी सदैव तयार असत.

अशा पराक्रमी आणि निष्ठावंत मावळ्यांमध्ये रणधुरंधर नरवीर मुरारबाजी देशपांडे हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. या सिनेमाच्या निमित्ताने स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा रुपेरी पडदयावर पाहायला मिळणार आहे.

१६६५ च्या आषाढात मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार असलेले मुरारबाजी देशपांडे फक्त बलाढ्य सातशे मावळ्यांसह दिलेरखानाच्या फौजेवर चालून गेले. आणि उत्तुंग पराक्रम केला.

फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ सिनेमांच्या घवघवीत यशानंतर आलमंड्स क्रिएशन्स व ए.ए.फिल्म्स यांनी ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमाची निर्मिती अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांनी केलीय. फर्जंद, फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड सिनेमांनंतर अभिनेता अंकित मोहन पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी सज्ज झालाय. १७ फेब्रुवारी २०२३ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com